अबब..! एकाच घरात निघाले २६ साप

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
नागपूर, 
कामठी, भिलगावातील बिसन गोंडाणे यांच्या घरी सापाची दोन पिले आढळली. snake साप दिसताच त्यांनी लगेचच वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे सदस्य सर्पमित्र सागर चौधरी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता सागरने घटनास्थळ गाठले. यानंतर या परिसराची पाहणी केली असता दोन नव्हे तर सापाची तब्बल २६ पिले त्याला सापडली.
 
 
Saap-24
 
snake : बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सर्पमित्र सागर याला बिसन गोंडाणे यांनी फोन करून सांगितल्यानंतर सागरने दोन पिले ताब्यात घेतली. ती कुठून आली असावीत, याचा शोध त्याने घेतला. झाडाजवळची माती बाजूला केली असता इतर पिले आढळली. एवढ्या मोठ्या पिले पाहून गोंडाणे परिवार धास्तावला. सागरने या पिलांना ताब्यात घेतले. हा साप बिनविषारी असल्याचे त्याने सांगितल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. पानदिवड प्रजातीची ही पिले होती. त्यांना लगेचच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.