आश्वस्त करणारी लष्करी गुंतवणूक

Investment-Indian Army आवश्यक वस्तूंचा पुरवठा

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
अग्रलेख
Investment-Indian Army शक्तिसंपन्नता दाखविण्यासाठी पूर्वापार चालत आलेली मैदानी युद्धे आताशी कुठे बघायला मिळत नाहीत. एखाद्या देशाच्या शक्तीचाच शोध घ्यायचा झाल्यास तुम्हाला त्या देशाची साधन संपन्नता, त्या देशातील पायाभूत सुविधांचा विस्तार, रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे, हवाई आणि जल वाहतुकीचे उपलब्ध पर्याय, कृषी क्षेत्रातील कामगिरी, त्या देशातील अर्थसबलता आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या देशाचे लष्करी सामर्थ्य याचा वेध घ्यावा लागतो. Investment-Indian Army तसा तो वेळोवेळी सर्वच देश घेतात. शक्तिसंपन्नतेचा विचार करता जितके महत्त्व लष्करी सामर्थ्याला दिले जाते, तितके महत्त्व कदाचितच इतर मुद्यांना दिले जाते. त्यामुळेच सारे देश आपापले लष्करी सामर्थ्य वाढविण्याच्या दिशेने पावले टाकताना दिसतात. यातूनच उत्तर कोरियासारखा देश एखाद्या नव्या मिसाईलचे परीक्षण करून, जगाला वाकुल्या दाखवतो आणि पाकिस्तानसारखा देश चीनच्या आडून भारताशी अकारण लष्करी सामर्थ्यात बरोबरी करण्याची इच्छा बाळगतो. Investment-Indian Army युक्रेन-रशिया युद्धातून अथवा इस्रायल-गाझा (पॅलेस्टाईन) युद्धात सहभागी देशांनी आपापल्या स्थलसेनेची, नौसेनेची आणि हवाई दलाची ताकद आजमावली. पण त्या युद्धात शक्तिसंपन्नता महत्त्वाची नाही. आपसी वादांमुळे निर्माण झालेले हे लढे कधी शमतील, याचा कयास लावणेही अवघड आहे.
 
 
Investment-Indian Army
 
Investment-Indian Army आपल्या देशाचे संरक्षण, हे प्रत्येक देशाचे प्रथम कर्तव्य आहे. देशावरील हल्ला परतवण्यासाठी शस्त्रसज्जतेशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणूनच त्यासाठी हवा तेवढा खर्च करण्यास प्रत्येक देशाने तयार असणे गरजेचे असते. आपल्याकडे किती शस्त्रास्त्र शक्ती आहे, हे दाखवून देण्याचादेखील अट्टहास प्रत्येक देशाचा असतो. गरजेनुसार प्रत्येक देश स्व-संरक्षणावर खर्च करतो आणि त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद केली जाते. यासाठी जो खर्च होतो, तो स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिपरी) सादर केलेल्या अहवालातून समोर आला आहे. जगाशी तुलना करता संरक्षण क्षेत्रात भारताचा होणारा खर्च जगात चौथ्या क्रमांकाचा असून तो समस्त भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी देणारा ठरावा. आपल्या देशाचे सरकार आपल्या नागरिकांच्या संरक्षणाबाबत किती जागरूक आहे, हेच यावरून दिसून येते. Investment-Indian Army काही जणांना संरक्षणावर होणारा खर्च वायफळ वाटू शकतो, पण जेव्हा भारतीय सैन्य पाकिस्तानच्या हद्दीत शिरून, तेथील दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करते, तेव्हा आपल्या देशाच्या सैन्याची ताकद दिसून आल्याशिवाय राहात नाही. गेल्या काही वर्षांत भारताने लष्करी खर्चात वाढ केली असून लष्कराच्या आधुनिकीकरणावरही जोर दिलेला आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. जगभरात युद्धाची स्थिती आहे. पश्चिम आशियात संघर्ष पेटला आहे. त्यामुळे कधीही मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकेल, अशा स्थितीत भारताचा संरक्षणावरील खर्च विरोधकांना घाम फोडायला लावणाराच म्हणावा लागेल.
 
 
 
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने जगातील देशांची यादी आणि त्यांचा लष्करावरील खर्च याचा अहवालच प्रकाशित केला आहे. Investment-Indian Army यात जगातील कोणते देश लष्करावर किती खर्च करतात, याची अद्ययावत माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार जगाचा सैन्य आणि शस्त्रास्त्र खरेदीवरील खर्च वाढलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगाचा सैन्यावरील खर्च हा १८३ लाख कोटी रुपये इतका झालेला आहे. यामध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर असून भारत चौथ्या स्थानावर आहे. २०२३ मध्ये सैन्य आणि शस्त्रास्त्रांवर विक्रमी २४४३ अब्ज डॉलर्स खर्च झाले. २०२२ मध्ये जागतिक लष्करी खर्चात ३.७ टक्क्यांनी वाढ झाली होती. Investment-Indian Army २०२२ मध्ये झालेला खर्च हा आतापर्यंत झालेल्या खर्चापेक्षा सर्वाधिक असल्याचे सिपरीने म्हटले आहे. सिपरीचा अहवाल असे सांगतो की, २०२३ मध्ये भारताने लष्करावर ८३.६ अब्ज डॉलर्स खर्च केले. हा खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत हा ४.२ टक्क्यांनी अधिक आहे. २०२० मध्ये भारत-चीन संघर्ष उफाळून आला होता. त्यावेळी भारताने चीनला इंगा दाखवला ही बाब निराळी. पण तेव्हापासूनच भारताने आपले लष्करी सामथ्र्य वाढविण्यास प्रारंभ केला. चीनला लागून असलेल्या भागात पायाभूत सुविधांच्या विकासावर जोर देण्यात आला. Investment-Indian Army रस्त्यांचे जाळे विणण्यालाही प्राधान्य देण्यात आले. यामुळे सीमावर्ती लष्करी तळांपर्यंत सैन्यासाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करताना लागणाऱ्या वेळेची बचत झाली.
 
 
 
सैनिकांना वेळेत ताजे अन्न पुरविणे शक्य झाले. सिपरीच्या अहवालानुसार, युरोपीय देशांत लष्करावर सर्वाधिक खर्च झालेला आहे. युरोपीय देशांनी १३ टक्के खर्च लष्करावर केलाय्. यात युक्रेनने सर्वाधिक म्हणजेच ४४ अब्ज डॉलर खर्च केला आहे. याचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनचे युद्ध. या युद्धाचा परिणाम म्हणून युरोपीय देशांत सर्वाधिक खर्च लष्करी शस्त्रांवर करण्यात आला आहे. Investment-Indian Army सर्वात जास्त खर्च अमेरिकेचा असून त्याने एकूण खर्चाच्या ३९ टक्के म्हणजेच ८७७ अब्ज डॉलर्स खर्च केला आहे. त्यापाठोपाठ चीनचा खर्च असून चीनने एकूण खर्चाच्या १३ टक्के म्हणजेच २९२ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. या यादीत भारताने लष्करावर ८१ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. हा खर्च एकूण खर्चाच्या ३.६ टक्के इतका आहे. या पृष्ठभूमीवर जागतिक क्रमवारीतील पहिल्या १० देशांनी लष्करावर केलेल्या खर्चाची नोंद घेतलीच जायला हवी. त्यानुसार पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून या देशाने ३९ टक्के म्हणजे ९१६ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. Investment-Indian Army दुसऱ्या  क्रमांकावरील चीनने १३ टक्के, रशियाने ३.९ टक्के, भारताने ३.६ टक्के तर पाचव्या क्रमांकावरील सौदी अरेबियाने ३.३ टक्के खर्च केले. त्यानंतर युनायटेड qकगडम ३.१ टक्के, जर्मनी २.५ टक्के, फ्रान्स २.४ टक्के, उत्तर कोरिया २.१ टक्के तर १० व्या क्रमांकावरील जपानने २.१ टक्के लष्करावर खर्च केले आहेत.
 
 
 
Investment-Indian Army भौगोलिक स्थितीमुळे भारताला संरक्षणाच्या दृष्टीने स्वतःचा बचाव करण्यासाठी नेहमीच तयार राहावे लागणार आहे, ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही. भारतापासून स्वतंत्र झालेला पाकिस्तान अजूनही आपल्याला पाण्यात पाहतो. जगभरातील दहशतवादाचा पोशिंदा म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. भारताशी स्पर्धा करणाऱ्या आणि सीमेवर वारंवार घुसखोरी करून आगळीक करणाऱ्या चीनचे त्याला पाठबळ असल्याने भारताला नेहमी सीमेवर डोळ्यात तेल घालून पाळतीवर राहावे लागते. आपली संरक्षण तयारी हेच आपले सर्वोत्तम संरक्षण असले, तरी त्या तयारीचा वेळोवेळी आढावा घेऊन, आमच्या सैन्याला त्यांना आवश्यक असलेल्या सर्व समर्थन प्रणालीसह सुसज्ज करणे आवश्यक आहे. Investment-Indian Army हीच बाब लक्षात घेऊन भारताने लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, रणगाडे, तोफा, रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. गरजेनुसार आयातही केली जात आहे. अनेक बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो असून इतर विकसित अर्थव्यवस्थांना स्वस्त दरात सेवा देण्यास सक्षम झालो आहोत.
 
 
 
भारताच्या चालू अर्थसंकल्पामध्ये संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याच्या अनुषंगाने तंत्रज्ञानामधील गुंतवणुकीवर लक्षणीय भर देण्यात आला आहे. संरक्षणविषयक आव्हानांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी जगभरामधील विविध सैन्यांनी टेक स्टार्टअप इकोसिस्टिमचा वापर सुरू केला आहे. Investment-Indian Army अमेरिका, फ्रान्स, जर्मनी तसेच युरोपियन युनियन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय, रोबोटिक्स, ऑगमेंटेड रिलिटी यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामधील संभाव्य प्रयोगांचा सक्रियपणे शोध घेत आहेत. भारताच्या सीमापल्याड सुरू असलेल्या युद्धाचे बदलते स्वरूप लक्षात घेता, अशा तंत्रज्ञानामध्ये वेळेवर गुंतवणूक केल्यास शत्रुराष्ट्रांविरुद्ध भारतासाठी हे एक धोरणात्मक पाऊल ठरणार आहे व याचा भविष्यातील युद्ध क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. जागतिक स्थिती आणि पाकिस्तान व चीनचा शेजार पाहता भारताने सर्व दृष्टीने सक्षम होण्याची गरज आहे. जग लष्करी ताकदीपुढेच नमते, ही बाब आता सर्वविदित आहे. Investment-Indian Army त्याकडे बघता भारताचा लष्करी गुंतवणुकीतील चौथा क्रमांक देशवासीयांना आश्वस्त करणारा आणि सशक्ततेच्या दिशेने पाऊल टाकणारा ठरणार आहे.