माधवी लता यांच्याकडे 218 कोटी रुपयांची संपत्ती

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
हैदराबाद,
Madhavi Lata हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) उमेदवार के माधवी लता यांनी बुधवारी त्यांच्या कुटुंबाची 218.28 कोटी रुपयांची चल आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली. लतादीदींच्या कुटुंबावर २७ कोटींची देणी आहे. भाजपा उमेदवाराच्या कुटुंबाकडे विरिंची लिमिटेडमध्ये 94.44 कोटी रुपयांचे 2.94 कोटी शेअर्स आहेत. लता यांचे पती विश्वनाथ कोंपल्ले यांनी आयआयटी मद्रासमधून शिक्षण घेतले आहे आणि ते फिनटेक आणि हेल्थकेअर कंपनीचे संस्थापक आहेत.
 
 
madhavi
 
भाजपाच्या माधवी लता यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, कुटुंबाकडे 165.46 कोटी रुपयांची जंगम आणि 55.92 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. जी कोणत्याही राजकारण्यासाठी मोठी संपत्ती असते. Madhavi Lata हैदराबादच्या जागेवर त्यांचा सामना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि विद्यमान खासदार असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद वलीउल्लाह समीर यांच्याशी होणार आहे. काँग्रेसने बुधवारी या जागेवरून यादी जाहीर केली आणि हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून मोहम्मद वलीउल्लाह समीर यांना उमेदवारी दिली.