वाशीम,
JEE exam वाशीम जिल्ह्यातील मंगरूळनाथ तालुयातील बेलखेड येथील ग्रामीण भागातील निलकृष्ण गजरे या शेतकर्याच्या मुलान जेईई परीक्षेमध्ये १०० पैकी १०० गुण मिळूनदेशात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे गावकर्यांसह देशभरातून त्याचं मोठं कौतुक केलं जात आहे.
आयआयटी सारख्या केंद्रीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी गाह्य धरल्या जाणार्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल नुकताच लागलेला असून, देशभरात २३ तर महाराष्ट्रातुन ३ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. त्यामध्ये वाशीम सारख्या छोट्या आणि ग्रामीण भागात राहणार्या निलकृष्ण गजरेचा नंबर असून, तो देशातून प्रथम आला आहे. निलकृष्ण हा मध्यमवर्गीय शेतकर्याचा मुलगा असून त्याचे वडील हे गावी शेती करतात. त्याच अवघं बारावी पर्यंत शिक्षण झाल असून आपल उच्च शिक्षणाच अधुर राहिलेल स्वप्न मुलानं पूर्ण कराव अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मुलाच्या शिक्षणावर सुरुवातीपासूनच त्यांनी भर दिला. सुरुवातीला अकोला येथील त्याच्या आत्या कडे पाठवून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकल, त्यानंतर कारंजा येथील जेसी चवरे हायस्कूल येथे त्याने पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले.JEE exam दहावीत त्याने ९८ टक्के गुण मिळवून तो प्रथम आला होता. त्यामुळे त्याच्या वडिलांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याची जेईई ची तयारी सुरू केली. तयारी करत असताना त्याने इन्स्टिट्यूट ची परीक्षा दिल्यानंतर त्याला स्कॉलरशिप मिळाली त्यातून त्याने अभासी लासेस लावले. अकरावी बारावी साठी त्याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील बुरूनले कॉलेज येथे प्रवेश घेतलला. सध्या तो इथेच बारावीचे शिक्षण घेत असताना त्याने जेईई ची परीक्षा दिली सर्व विषयात त्याने पैकीच्या पैकी गुण मिळवत तो १०० टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात पहिला आला.
निलकृष्णाच्या वडिलांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन शेतीत वळले त्यांनी उच्च शिक्षण घेतल नाही. त्यामुळे नीलकृष्णच्या आजी आजोबांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. मात्र, आता नातू त्यांच स्वप्न पूर्ण करत असून, तो राज्यातून प्रथम आल्यामुळे त्यांनाही मोठा आनंद झाला आहे. जेईई सारख्या कठीण परीक्षेत वाशीम सारख्या ग्रामीण भागातील शेतकर्याच्या मुलाने १०० पैकी १०० टक्के गुण मिळवणे ही अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थांसाठी प्रेरणादायी आहे.