तभा वृत्तसेवा
आर्वी,
Assembly Constituency : येथील एका मतदान केंद्रांवर मत पत्रिका उलटी लागल्यामुळे मतदानाकरता उशिरा झाला. मतदान सुरू होण्यापूर्वी काही मशीनमध्ये माकपोल केल्यानंतर तांत्रिक बिघाड आढळल्यामुळे काही मशीन बदलण्यात आल्या. विधानसभा क्षेत्रातील 304 मतदान केंद्रापैकी 150 मतदान केंद्र हे थेट नियंत्रण कक्षाशी जोडल्या गेले होते.
मतदान काळात कुठे अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 67 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदानाकरता मतदारांनी गर्दी केली होती. आज उन्हाची तीव्रता कमी असल्यामुळे मतदार उत्साहाने मतदानाकरता बाहेर पडले संध्याकाळी सहा नंतर सुद्धा काही मतदान केंद्रावर मतदारांची रांग दिसून आली. आज विवाहाचा मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे काही ठिकाणी नवरदेवांनी प्रथम राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. येथे दिवसभर आ. दादाराव केचे, लोकसभा प्रभारी सुमित वानखेडे, ज्येष्ठ नेते सुधीर दिवे संपर्कात होते.