वारशाचा वाद !

Congress-Sam Pitroda जाहीरनामा ऐतिहासिक वगैरे...

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
अग्रलेख
Congress-Sam Pitroda देशाच्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुका आणि त्या निमित्ताने मतदारांना आपलेसे करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रसिद्ध केलेले जाहीरनामे यावर सध्या सुरू असलेली देशव्यापी चर्चा, हा जाहीरनाम्यांच्या परंपरेतील एक ऐतिहासिक विषय ठरणार आहे. Congress-Sam Pitroda कारण, राज्यकर्त्याची भूमिका वठविण्याच्या अपेक्षेने निवडणुकांच्या आखाड्यात उतरलेल्या राजकीय पक्षांची जनतेविषयीची भावना, राष्ट्रीय प्रश्नांविषयीच्या भूमिका, देशाची अर्थनीती आणि सामाजिक समस्यांची जाण आदी अनेक बाबींचा ऊहापोह या जाहीरनाम्यांच्या निमित्ताने देशात सुरू झाला आहे. Congress-Sam Pitroda गेल्या आठवडाभरापासून काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही मुद्यांवरून वादाला तोंड फुटले आहे. खरे म्हणजे, काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अनेक निवडणुकांत सातत्याने पराभव पत्करल्यामुळे विकलांग झालेल्या काँग्रेसच्या तंबूचे अंतिम आधारस्तंभ म्हणून पक्ष ज्यांच्याकडे विश्वासाने पाहतो, त्या राहुल गांधी यांनी यापैकी काही मुद्दे आपल्या जाहीर सभांमधूनही वेळोवेळी उगाळले आहेत. Congress-Sam Pitroda पण त्यांच्या सर्वच भाषणांस नेहमीच गांभीर्याने घेतले जात नसल्याने त्यावर फारशी चर्चा न होता त्याची खिल्लीच उडविली जात होती. आता मात्र राहुल गांधींच्या अनेक भाषणांतील ते मुद्दे म्हणजे त्यांच्या पक्षाची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे काँग्रेसी भूमिकेतील मुद्दे चर्चेच्या आणि वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.Congress-Sam Pitroda
 
 

Congress-Sam Pitroda 
 
 
Congress-Sam Pitroda एका परीने ते चांगलेच झाले. या भूमिकेमुळे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक ढाच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याकडे देशाचे लक्ष वेधल्यामुळे त्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. काँग्रेसच्या सुमारे साडेपाच दशकांच्या राजवटीतील अनुभवांवरून व सत्तेवर येण्याची खात्री किंवा आत्मविश्वासच नसेल तर वारेमाप घोषणांचा वर्षाव करण्यात कोठेच हात आखडता घेण्याची गरज नसल्याच्या भावनेनेच अशा घोषणा केल्या जात असल्याचे जनतेस माहीत असल्याने या जाहीरनाम्यातील न्याय आणि हमीपत्रांची तशी फारशी चर्चादेखील झाली नव्हती. Congress-Sam Pitroda सुमारे पाच दशकांपूर्वी काँग्रेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव' ही घोषणा देऊनच देशातील जनतेला संपन्नतेचे स्वप्न दाखविले होते. त्याच काळात जगातील अन्य देशांकडे हात पसरून आयात केलेले ‘मिलो' नावाचे निकृष्ट दर्जाचे धान्य खाऊन गुजराण करण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली होती, याची विसर न पडलेली पिढी अजूनही हयात असल्याने नव्या जाहीरनाम्यातील गरिबांविषयीच्या कळवळ्याचा बेगडी मुलामा जनतेस भुरळ घालण्यास फारसा उपयोगी ठरणार नाही. Congress-Sam Pitroda हा जाहीरनामा ऐतिहासिक वगैरे असल्याचे सांगत राहुल गांधी स्वतः पक्षाची पाठ थोपटत होते.
 
 
 
 
त्यामुळे या जाहीरनाम्यावर राहुल गांधींच्या वैचारिक बैठकीचा प्रभाव आहे आणि त्यांच्या सूचना किंवा मार्गदर्शनाच्या चौकटीबाहेर न जाता जाहीरनामा तयार करण्याची काळजी काँग्रेसने घेतली असावी, असे मानण्यास पुरेसा वाव आहे. या देशातील संपत्तीचे केंद्रीकरण संपवून सर्वांना संपत्तीचे समान वाटप केले जाईल, अशी भूमिका मांडणारी वक्तव्येही त्यांनी वेगवेगळ्या मंचांवरून बोलताना केली होती. Congress-Sam Pitroda काँग्रेसच्या न्याय आणि हमीयुक्त जाहीरनाम्यातील राहुल गांधी यांच्या याच विधानांचे धागे नेमके पकडून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या हल्ल्यातून उमटलेले वादळ अजूनही शमलेले नाही. ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' या काँग्रेसच्या अंतर्गत संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसी नेतृत्वाच्या तीन पिढ्यांचे सल्लागार असलेले सॅम पित्रोदा यांनी नव्याने एका जुन्या मुद्यास पुन्हा तोंड फोडून काँग्रेसच्या एकूणच सामाजिक, आर्थिक भूमिकेविषयीचे नवे वादळ ओढवून घेतले आहे. Congress-Sam Pitroda श्रीमंताकडील अतिरिक्त मालमत्ता व संपत्ती ताब्यात घेऊन त्यांचे अभावग्रस्तांमध्ये वाटप करणे, ही माओवादी नीती राहुल गांधी यांच्या वक्तव्यांतून याआधीही उमटलेली होती. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही त्याला पुष्टी देणारे काही दावे केले गेल्याने पंतप्रधान मोदी यांनी त्यावर बोट ठेवताच काँग्रेसचे धाबे दणाणले आणि या दाव्यांच्या समर्थनार्थ सारवासारव सुरू झाली.
 
 
 
Congress-Sam Pitroda पित्रोदा यांनी वारसा कर कायद्यावरून केलेल्या वक्तव्याने काँग्रेसच्या एकूणच भूमिकेस अप्रत्यक्ष पुष्टी मिळाली आहे. संपत्तीचे समान वाटप करण्यासाठी अतिरिक्त संपत्ती बाळगणाèयांकडून त्यांची संपत्ती काढून घेण्याची मानसिकता आणि एखाद्या धनवंताच्या निधनानंतर वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीपैकी मोठा हिस्सा सरकारजमा करण्याच्या भूमिकेचे समर्थन करणारी पित्रोदा यांची भूमिका परस्परांस पूरक असल्याचे स्पष्ट झाल्याने काँग्रेसी जाहीरनामा म्हणजे मानसिकतेचा स्पष्ट आरसा ठरला आहे. Congress-Sam Pitroda या देशातील साधनसंपत्तीवर अल्पसंख्यकांचा, म्हणजे मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, अशा अर्थाचे विधान काँग्रेसचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्या पदावर असताना केले होते. काँग्रेसी जाहीरनाम्यातील संपत्ती व मालमत्तांच्या समान वितरणाच्या वादाचे मूळदेखील त्या वक्तव्यातच असल्याचा आरोप केला जात आहे. साधनसंपत्तीवर अल्पसंख्यकांचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी अतिरिक्त मालमत्ता व संपत्ती ताब्यात घेऊन तिचे वितरण अल्पसंख्यकांमध्ये करण्याचा काँग्रेसचा इरादा असल्याचा आरोप होऊ लागला असताना पित्रोदा यांनी धनवंतांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा सरकारजमा करण्याच्या अमेरिकी कायद्याची वकिली केली.Congress-Sam Pitroda
 
 
 
देशात निर्माण झालेल्या संभ्रमानंतर आता सारवासारव करत बचावाची भूमिका घेण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. एका बाजूला काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा देशाला याआधीही अनुभव आला असल्याने आता तर थेट जाहीरनाम्यातून त्याच राजकारणाची री ओढण्याचे व त्यास पूरक ठरणारी विधाने करून संभ्रमाचे मुद्दे नेटकेपणाने मांडण्याचा हा प्रयत्न अजाणता किंवा अनवधानाने झाला असावा का, याबाबत शंका उपस्थित होऊ शकते. Congress-Sam Pitroda सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे धोरणविषयक सल्लागार असल्याचे बोलले जाते. राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यातील अनेक मुलाखती, भाषणे आणि त्यासाठीची वैचारिक मांडणी करणाऱ्या  पक्षाच्या फळीत पित्रोदा यांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच राहुल गांधींची याआधीची वक्तव्ये आणि पित्रोदा यांचे वारसा कर कायद्याच्या समर्थनाचे वक्तव्य यांचे दुवे जोडले जात आहेत. त्यामुळे पित्रोदा यांचे वक्तव्य, काँग्रेसचा जाहीरनामा आणि राहुल गांधी यांची याआधीची भाषणांतील भूमिका यांचे दुवे नेमके जोडल्यास काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून स्पष्ट होणारी देशाच्या सामाजिक, आर्थिक वाटचालीविषयीची भूमिका अधिक स्पष्ट होऊ शकते.
 
 
 
Congress-Sam Pitroda कोणाही कुटुंबाची अधिकृत संपत्ती व मालमत्ता ही त्यांच्या पिढ्यांची कष्टाची कमाई आहे. कष्ट करून कमाई करण्याचा हक्क प्रत्येकास असल्याने ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला कमाईचा हक्क मिळावयास हवा. त्यासाठी प्रत्येक हातात क्षमता निर्माण करावयास हवी, ही भूमिका समर्थनीय असू शकते. यातूनच अंत्योदयाचा विचारही बळकट होतो. मात्र, एकाकडून संपत्ती किंवा  मालमत्ता हिसकावून घेऊन त्याचे अन्यांस वाटप करणे ही माओवादी मानसिकता आहे. Congress-Sam Pitroda अशा वर्गकलहातून सामाजिक संघर्षदेखील उद्भवण्याची शक्यता आहे. एका वर्गास संपत्ती मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून त्याचे लांगूलचालन करणे किंवा  आयत्या संपत्तीची आमिषे दाखवून राजकीय स्वार्थाची गणिते साध्य करणे कोणाच्याही हिताचे नाही. संपत्तीची निर्मिती करण्याची क्षमता प्रत्येक हातामध्ये निर्माण करण्याचा विश्वास समाजात रुजविण्याची गरज आहे. अशा वादग्रस्त भूमिकांची राजकीय वादळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुदृढ राजकारणास अपेक्षित नाही. Congress-Sam Pitroda निवडणुकीच्या राजकारणापायी सामाजिक स्वास्थ्य आणि व्यवस्थांची दुरवस्था झाली तर त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल, याचे भान असलेले चांगले!