बंदूक स्वच्छ करताना गोळी सुटली, कॉन्स्टेबलचा मृत्यू

26 Apr 2024 19:53:49
- माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानी घटना
 
रायपूर, 
राजधानी रायपूर येथील माजी काँग्रेस आमदार देवती कर्मा यांच्या सिव्हिल लाईन येथील निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात Constable Chhattisgarh छत्तीसगड सशस्त्र दलाच्या कॉन्स्टेबलच्या बंदूकीतून शुक्रवारी सकाळी अनवधानाने गोळी सुटली. यात एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून एक जवान जखमी आहे.
 
 
Gun
 (संग्रहित छायाचित्र)
 
 
Constable Chhattisgarh : पोलिस अधिकार्‍याने सांगितले, देवती कर्मा यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या निवासस्थानी छत्तीसगड सशस्त्र दलाचे चार कर्मचारी 24 तास तैनात असतात. शुक‘वारी सकाळी निवासस्थानाच्या प्रवेशद्बारावर असलेल्या बॅरकमध्ये हेड कॉन्स्टेबल अजय सिंह व राम कुमार दोहरे बंदूक स्वच्छ करीत होते. यावेळी बंदुकीतून दोन गोळ्या सुटल्या. यातील एक गोळी अजय सिंह यांच्या छातीला लागली तर दुसरी गोळी दोहरे यांच्या खांद्यातून आरपार गेली. इतर दोन जवानांनी तत्काळ त्यांना जवळील खाजगी रुग्णालयात नेले असता अजय सिंह यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर दोहरे यांना उपचारासाठी दाखल केले.
 
 
Powered By Sangraha 9.0