केजरीवाल यांना केवळ सत्तेचा मोह

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
- दिल्ली हायकोर्टाने फटकारले
 
नवी दिल्ली, 
Delhi High Court : दिल्ली सरकारला केवळ सत्तेत राहण्यातच रस आहे. अटक होऊनही राजीनामा न दिल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रहितापेक्षा वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य दिल्याचे परखड मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले. दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके न दिल्याबद्दल हायकोर्टाने दिल्ली सरकार आणि महानगरपालिकेला (एमसीडी) फटकारले.प्रभारी मुख्य न्या. मनमोहन आणि न्या. मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांनी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना ही तीव्र टिप्पणी केली. महापालिकेच्या आपसातील भांडणामुळे एमसीडी शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळत नसल्याने त्यांना टिनाच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
 
 
Arvind kejariwal
 
Delhi High Court : न्या. मनमोहन यांनीही नगरविकास मंत्री सौरभ भारद्वाज यांच्यावर भाष्य केले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या दुरवस्थेकडे डोळेझाक करून मगरीचे अश्रू ढाळत असल्याचे म्हटले. दिल्ली सरकारचे वकील शादान फरासत यांनी सांगितले की, त्यांना सौरभ भारद्वाज यांच्याकडून सूचना मिळाल्या आहेत की, एमसीडी स्थायी समितीच्या अनुपस्थितीत योग्य प्राधिकरणाकडे अधिकार सोपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची संमती आवश्यक असेल. सध्या केजरीवाल तुरुंगात आहे. विद्यार्थी शाळेत जात नाहीत किंवा पुस्तके नाहीत, याची दिल्ली सरकारला अजिबात काळजी नाही, असे न्यायालयाने आपल्या टिप्पणीत म्हटले आहे. तुम्हाला फक्त सत्तेत रस आहे. इथे सत्तेचा अहंकार शिगेला पोहोचला आहे, अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने केली आहे.