देवळीत मतदारांना 'गुलाबी'अनुभूती

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
देवळी ,
Deoli Voters स्थानिक नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदारांना गुलाबी रंगाची एक आगळीच अनुभूती अनुभवास मिळाली त्यामुळे या केंद्रावरील मतदारांमध्ये उत्साह संचारला.या व्यतिरिक्त उष्णतेपासून बचाव व्हावा म्हणून शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मंडप आणि पेयजल व्यवस्था करण्यात आली. या दोन्ही बाबीचा देवळीकर पहिल्यांदाच अनुभव घेत असल्याने 'देश खरोखरच बदल रहा है' अशी चर्चा मतदारांमध्ये रंगली . परिवाराचे १०० टक्के मतदान करा; जेवणावर १० सवलत
 
 
deoli
 
नप कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 176,181 आणि 182 अशा एकूण तीन मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाने गुलाबी रंगाचे नियोजन केले. प्रवेशद्वारावरील कमान गुलाबी रंगाच्या फुग्याने सजविण्यात आले. कमानीतून प्रवेश करतांना मतदारांना उत्साहाची अनुभूती होत होती तर मतदान कक्षामध्ये टेबलवरील गुलाबी चादर आणि गुलाबाच्या पाकळ्या मतदारांना प्रसन्न करीत होते.या केंद्रावर निवडणूक कर्मचारी म्हणून फक्त महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती प्रशासना तर्फ करण्यात आली.आणि या कर्मचाऱ्यांनी सुद्धा गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले होते.
निवडणूक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांशी याबाबत विचारले असता महिलांमध्ये मतदार जागृती व्हावी या उद्देशाने या संकल्पनेचा अंगीकार करण्यात आला असे त्यांनी यावेळी सांगितले.Deoli Voters तसेच रांगेमधील महिलांच्या गर्दीवरून गुलाबी संकल्पना यशस्वी होत असल्याचे समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी नारायण फटिंग आणि पप्पू टावरी या मतदारांनी या अभिनव कल्पनेचे स्वागत करीत महिलांनी आपला मतदान हक्क बजावून गुलाबी संकल्पनेच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना यशस्वी करावे असे आवाहन केले.
(तभा वृत्तसेवा)