बोटाला चुन्यापेक्षा शाई महत्त्वाची !

Election 2024-second phase मतदान हे पवित्र कार्य

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
वेध
 
- प्रफुल्ल व्यास 
 
 
Election 2024-second phase देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. तो उत्सव साजरा करण्याची अंतिम जबाबदारी ‘मतदार राजा'ची आहे. या पृथ्वीवर सर्वाधिक महत्त्व राजाला असते. तेच महत्त्व संविधानाने आपल्याला दिले आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एकाकडे लक्ष देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. Election 2024-second phase परंतु, आपल्याला नेमका त्याच दिवशी कंटाळा येतो. बाहेर निघण्याची आणि मतदान केंद्रावर जाण्याची इच्छाच होत नाही. नंतर मात्र पाच वर्षे आपण नाना प्रकारांचे आरोप करून सरकारच्या नावाने बोटं मोडत बसतो. आपल्या संस्कृतीत दानाला महत्त्व आहे. तसे सर्वच जाती-धर्मात वेगवेगळ्या प्रकारे दानधर्म केला जातो. Election 2024-second phase विज्ञान युगात आता त्यात पुन्हा रक्तदान, नेत्रदान, अवयवदानाची भर पडली. मात्र, हे दान देण्यासाठीचे जे कायदे तयार होतात, ते कायदे ज्या ठिकाणी तयार होतात त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपण एवढे असंवेदनशील का, असा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. Election 2024-second phase गेल्या आठवड्यात नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. काय परिस्थिती आहे तेथील मतदानाची?
 
 

Election 2024-second phase
 
 
 
नागपूरसारख्या उपराजधानीत झालेले मतदान हे तेथील सुशिक्षित मतदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. त्या उलट गडचिरोलीने दिलेला टक्का कौतुकाचा आहे. Election 2024-second phase देशात महाराष्ट्र सर्वाधिक सुधारलेले, पुरोगामी विचाराचे राज्य म्हणून ओळखले जात असताना मिझोरामसारख्या राज्यात ५६.६ टक्के मतदान होऊ शकते. त्या राज्यात महाराष्ट्रासारख्या फारशा सोयीसुविधा नाहीत. महाराष्ट्र सुधारणा स्वीकारलेले राष्ट्र असताना येथे पहिल्या टप्प्यात ५७.८ टक्के मतदान झाले. देशात पहिल्या टप्प्यात सरासरी ६३.७ टक्के मतदान होणे, हे मजबूत लोकशाहीसाठी चांगले संकेत नाहीत. एकीकडे संविधान धोक्यात आल्याची ओरड होत असताना त्या संविधानाने दिलेला हक्क बजावण्यासाठी आपण काचकुच करीत असू तर देशांच्या नेत्यांकडून काय अपेक्षा करायची? Election 2024-second phase मतदान कोणाला करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. प्रचारात कोण आघाडी घेते, कोणाचा जाहीरनामा काय? कोण काय आश्वासनं देतात हाही त्या त्या पक्षाचा विषय आहे. परंतु, आपल्याला मिळालेला हक्क आपण बजावणारच नसणार तर ते कोण्या एकाच्या घरचे लग्न नाही.
 
 
 
आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करण्याची दिलेली ही संधी आहे. शासकीय अधिकारी निगरगट्ट आहेत. त्यांना कितीही दिले तरी कमीच पडते. Election 2024-second phase त्यांना कशाचेच काही करायचे नसते. त्यांना फक्त चौथा, पाचवा, सातवा नंतर आठवा वेतन आयोग, डीए, सुट्या हव्या असतात. त्यांना तर निवडणुकीच्या दोन दिवसांच्या कामाचाही कंटाळा येतो. मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रावर ड्युटी लागू नये यासाठी सरकारी कर्मचारी खोटी कारणं दाखवतात. वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कृपया सुटीसाठी कोणी येऊ नये' असा फलकच उपविभागीय अधिकाऱ्यांनी लावला. बरं, निवडणूक काळात वेतनाव्यतिरिक्त डीएही कर्मचाऱ्यांना दिला जातो. शासन जर मतदान हे पवित्र कार्य म्हणत असेल तर आपल्याच कर्मचाऱ्यांना या पवित्र कार्यासाठी अतिरिक्त पैसे का देतं? Election 2024-second phase हे पवित्र कार्य पार पाडण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची नाही का? हा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. निवडणूक विभागाचे अधिकारी १०० टक्के मतदानाचे आवाहन करतात. त्यासाठी आवश्यक तो कुळाचारही ते पार पाडतात. परंतु, लोकप्रतिनिधी निवडून देण्याची जबाबदारी आपली असते. त्यासाठी शासकीय यंत्रणेला दोषी ठरवून चालणार नाही.
 
 
 
नागपुरात अनेक परिवारांची नावं मतदार यादीतून गहाळ झाली. त्याला मतदार सजग नाही हे जेवढे सत्य आहे, तेवढेच ज्या पक्षाचा उमेदवार उभा आहे, त्या पक्षाचे कार्यकर्ते वा संबंधितांची जबाबदारी नाही का? Election 2024-second phase परंतु, जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हाच नेमके मतदारांची नावं गायब होणे, मतदारांना मतदानासाठी जाण्याचा कंटाळा येणे या गोष्टी पुढे येतात. काही वर्षांपूर्वी गावागावांतून मतदार सकाळपासून बाहेर काढण्याची प्रक्रिया पार पाडली जात होती. आता तर आजच्या तारखेला अनेकांना मतदान चिठ्ठ्याच मिळाल्या नाहीत आणि मतदारही शोधणार नाहीत. त्याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात आज वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यासह देशातील १३ राज्यांत ८९ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. Election 2024-second phase आपण मॉलमध्ये जाऊन तास दोन तास खरेदीत घालवतो. तिथेही रांगेत उभे राहतो. थिएटरमध्येही तिकीट घेण्यासाठी रांगेत लागतो. मग, मतदान करण्यासाठी रांगेत लागण्याची लाज का? अरे, सशक्त लोकशाही आणि एकहाती सत्तेसाठी मतदान करायला बाहेर निघा. एरवी जास्त पैशांच्या लोभात अनेक सुशिक्षितांना चुना लावला जातो; आता बोटाला शाई लावून देशातील लोकशाही बळकट करा राजे हो...
९८८१९०३७६५