युपीएससीत यश संपादन करणार्‍या काजल, गौरवचा सत्कार

26 Apr 2024 16:18:48
सडक अर्जुनी, 
UPSC success गोरेगाव येथील काजल आनंद चव्हाण हिने युपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून 753 वी रँक प्राप्त केली. तसेच गौरव हितेश टेंभुर्णीकर यांने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून 966 वा क्रमांक पटकाविला.
 

UPSC 
 
समाजशील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांनी दोघोच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केला. यावेळी मेश्राम यांनी काजल व गौरवला भारताचे संविधान, शाल, पेन, पुष्पगुच्छ देत पेढा भरवून सत्कार केला. यावेळी काजलचे आईवडील, आजोबा, थोरला भाऊ तसेच गौरवचे आईबाबा, भाऊ-बहीण उपस्थित होते.UPSC success यावेळी स्पर्धा परीक्षेची तयाारी करणारे हर्षा मुनिश्वर, मयुरी मेंढे, समिक्षा अंबादे, मोहित गणवीर यांनी काजल व गौरवशी संवाद साधून युपीएससी परीक्षा तयारीबाबत माहिती जाणून घेतली.
 
 
Powered By Sangraha 9.0