बेताल वक्तव्ये करणार्‍या राहुल गांधींना मतदार धडा शिकवतील

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
- केशव उपाध्ये यांचा इशारा

मुंबई, 
सोलापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी व अवमानकारक उल्लेख करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची संस्कृती दाखवून दिली. त्यांनी केवळ नरेंद्र मोदी यांचाच नव्हे, तर देशाच्या सर्वोच्च सांविधानिक पदावरील व्यक्तीचा अपमान केला असून, पराभवाच्या भीतीने वैफल्य आल्यामुळे त्यांचा जिभेवरील ताबा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत अशा असभ्य व उर्मट नेत्यांना व त्यांच्या पक्षाला जनता त्यांची जागा दाखवून देईल, असे भाजपो प्रदेश मुख्य प्रवक्ते Keshav Upadhyay केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
 
 
Rahul gandhi dkl
 
Keshav Upadhyay : सोलापूरच्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा सातत्याने एकेरी उल्लेख केला. त्यांचे हे वक्तव्य आणि वर्तन राजकीय संस्कृतीला शोभणारे नसून, केवळ वैफल्य व अपरिपक्वपणा दर्शविणारे आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआला प्रचंड जनाधार मिळत असून, 400 पेक्षा अधिक जागांवरील भाजपा आघाडीचा विजय निश्चित झाल्याने काँग्रेस व इंडिया आघाडीला वैफल्य आले आहे. राहुल गांधी यांच्या भाषणात याआधीही सुसंस्कृतपणा आणि अभ्यासाचा अभावच होता. आता तर त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, उमेदवारही नाहीत आणि निवडणूक लढविण्याची उमेदही राहिलेली नाही. त्यातच, पंतप्रधानांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा पंचनामा करून जनतेची संपत्ती हिरावून घेण्याचा कट उघड केल्यामुळे काँग्रेसची भंबेरी उडाली आहे, असे ते म्हणाले.
 
 
निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने राहुल गांधी यांच्या पायाखालची वाळू घसरली होतीच, पण आता जीभही घसरत चालली असून, काँग्रेसमुक्त भारताच्या संकल्पास ते स्वतःच हातभार लावत आहेत, अशी खोचक टिप्पणीही उपाध्ये यांनी केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राहुल गांधींची पंतप्रधानांविषयीची असभ्य भाषा मान्य आहे का, असा सवालही त्यांनी केला.