महापौरपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल एमसीडी सभागृहात गदारोळ

26 Apr 2024 21:27:31
- आप-भाजपा नगरसेवकांची घोषणाबाजी
 
नवी दिल्ली, 
MCD Auditorium : एमसीडी सभागृहाच्या अधिवेशनात शुक‘वारी होणार्‍या महापौरपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल गदारोळ झाला. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आप आणि भाजपाच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. निवडणुकीच्या पीठासीन अधिकार्‍याची नियुक्ती न झाल्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा महापौर व उपमहापौर निवडीसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली. सभेला उशिरा आलेल्या महापौर शेली ओबेरॉय यांच्या उपस्थितीची मागणी करीत भाजपा नगरसेवकांनी महापौरांच्या आसनाला घेराव घालून घोषणाबाजी केली.
 
 
MCD
 
MCD Auditorium : महामंडळाच्या मुख्यालयातील आंबेडकर पुतळ्याजवळ आप नगरसेवकांनी सुरुवातीला भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी केली. नंतर ते सभागृहात पोहोचले आणि विरोधी पक्षाला दलित विरोधी भाजपा म्हणत त्यांच्या विरोधात घोषणा देत राहिले. राखीव प्रवर्गातील उमेदवार दिल्लीचा महापौर होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याने आपने भाजपाला दलित विरोधी म्हटले आहे. सुमारे तासभर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. महापौर शेली ओबेरॉय सभागृहात पोहोचल्यानंतर त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल विजयकुमार सक्सेना यांच्यावर संविधानाची हत्या केल्याचा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीचा बहाना म्हणून वापर केल्याचा आरोप केला. त्यानंतर महापौरांनी सभागृहाची बैठक पुढील सभेपर्यंत तहकूब केली आणि निघून गेल्या.
Powered By Sangraha 9.0