ईव्हीएम बिघाडीमुळे खासदार रांगेत ताटकळत उभे

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
देवळी, 
Wardha Lok Sabha तांत्रिक कारणामुळे ईव्हीएम मध्ये बिघाडी उद्भवल्याने खुद्द खासदार यांना रांगेत सुमारे पाऊण तास रांगेत ताटकळत उभे राहण्याची घटना समोर आली आहे. यशवंत कन्या शाळेतील केंद्र क्रं.185 वर मतदान करण्यासाठी विद्यमान खासदार रामदास तडस हे सकाळी 7 वाजता सहपरिवार आले. परंतु मशीन बंद मुळे त्यांना तब्बल पाऊण तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे निवडणूक यंत्रणेशी संबंधित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. शेवटी 7.45 ला तांत्रिक दुरुस्ती होऊन मतदान सुरु झाले.

Wardha Lok Sabha 
 
खा. तडस यांनी आपल्या प्रतीक्षा क्रमांकानुसार मतदान केल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 5 30 ला मशीनमध्ये दोष आढळून आला आणि मतदान सुरु होण्याची 7 वाजताच्या वेळेपर्यंत ईव्हीएम मात्र सुरु होऊ शकले नाही. Wardha Lok Sabha त्यामुळे उपस्थित मतदारांमध्ये काही काळासाठी रोष निर्माण झाला. मतदारांच्या रांगेत सुद्धा वाढ झाल्याने प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाला होता.अशा वेळी पो. नि. सार्थक नेहेते यांनी मनोज नाप्ते आणि सहकाऱ्यांच्या मदतीने स्थिती सांभाळली.