विधानसभा निवडणुकीतून राजकारणाचा श्रीगणेशा

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
- मनोज जरांगे यांची घोषणा
 
परभणी, 
लोकसभा निवडणुकीसाठी आमची तयारी नव्हती, मराठा समाजाने या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. याचा अर्थ आम्ही माघार घेतली असा होत नाही. लोकसभेत माघार घेतली पण विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र असेल. 288 मतदारसंघात मराठा उमेदवार निवडणुकीत उतरवून राजकारणात प्रवेशाचा श्रीगणेशा करणार असल्याची घोषणा मराठा आंदोलनकर्ते Manoj Jarange मनोज जरांगे यांनी केली आहे.
 

Manoj Jarange 
 
परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड येथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आजारी असलेले Manoj Jarange जरांगे पाटील रुग्णवाहिकेतून आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आपण राजकारणात नाही, लोकसभा निवडणुकीत कोणालाही उभे केले नाही. परंतु विधानसभेसाठी सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. मराठा समाजाची बाजू विधिमंडळात मांडणार्‍या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे विधानसभेच्या सर्वच जागा आम्ही लढवणार आहे.
मराठा समाजाचा कुणालाही पाठिंबा नाही
Manoj Jarange जरांगे म्हणाले, मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जो उमेदवार सगे-सोयर्‍याच्या बाजूने आहे, त्याला मतदान करा, असे मी सांगितले आहे. लोकसभेला आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही. मात्र मराठ्यांना बरोबर माहिती आहे, कोणाला मतदान करायचे आहे, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.