बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाचा जनतेला ‘संदेश’

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस,
Ralegaon Assembly बापूनगरातील संदेश अस्वार याचे शुक‘वार, 26 एप्रिल रोजी मंगरुळनाथ येथे लग्न होते. या लगीन घाईत ‘आधी मतदान नंतर लग्न’ असे म्हणत संदेशने मतदानाच्या मोलाची जनतेला जाणीव करून दिली. मतदानाचा दिवस सुट्टी समजून अनेक महाभाग मतदान करत नाहीत. अनेक तर बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. तर उमेदवार नापसंत म्हणून अनेकजण मत देण्यासाठी जात नाहीत.

Ralegaon Assembly 
 
मात्र आयुष्यातील लग्नासारखी महत्वाची घटना असून देखील राष्ट्रहित लक्षात घेत संदेशने लग्नाआधी मतदान मतदानाचे महत्व विषद केले. Ralegaon Assembly लग्नाची आणि मतदानाची एकच तारीख निघाल्याने संदेश अस्वारने परिवारातील सर्वांना आधी मतदान केंद्रावर आणले. स्वतःचे व परिवाराचे मतदान करुनच सर्व वर्‍हाड गाडीत बसून लग्नासाठी रवाना झाले. परिसराती लोकांनी मतदानाला महत्व देणार्‍या संदेशचे कौतुक करून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.