नवज्योत सिंग सिद्धूचा राहुल द्रविडला सल्ला

26 Apr 2024 14:28:41
मुंबई, 
Navjot Singh Sidhu माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे एक्सपर्ट नवज्योत सिंग सिद्धू यांनी आगामी टी20 विश्वचषक 2024आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. सिद्धू म्हणतो की, भारतीय संघाने या मेगा इव्हेंटमध्ये फलंदाजी वाढवण्याऐवजी विशेषज्ञ गोलंदाजांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
 

Navjot Singh Sidhu 
 
सिद्धू म्हणतो की तुम्ही अशा तज्ञ गोलंदाजांना खेळवा जे 5 विकेट घेऊ शकतील. 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होत आहे. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या या मेगा स्पर्धेतून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा संघ पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. Navjot Singh Sidhu नवज्योतसिंग सिद्धूने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, "राहुल द्रविडला माझा साधा सल्ला आहे की, जर तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची असेल, तर पाच विकेट घेणारे विशेषज्ञ गोलंदाज हवेत. तुम्ही जेव्हा तडजोड करता तेव्हा तुमच्या चारित्र्यावर परिणाम होतो. आमच्याकडे तीन फिरकीपटू बिश्नोई, कुलदीप आणि जडेजा आहेत. आणि तीन वेगवान गोलंदाज. तो पुढे म्हणाला, "मयंक यादव, जर फिट असेल तर त्याला संघात आणा. खलील अहमद, मोहसीन खान. आणि दिल्ली कॅपिटल्सकडे मुकेश कुमार आहेत. मला वाटतं भारतीय संघाकडे खूप पर्याय आहेत जर त्यांना विकेट घ्यायची असेल तर.
Powered By Sangraha 9.0