-‘यशोगाथा- नूतन भारतची’ चे प्रकाशन
नागपूर,
Chinmayi Sumeet Raghavan मराठी भाषेला जीवंत ठेवायचे असेल तर त्यासाठी तिचा सतत वापर व्हायला हवा, असे मत मराठी अभिनेत्री चिन्मयी सूमित राघवन यांनी आज येथे व्यक्त केले. भारतीय विद्या प्रसारक संस्था संचालित नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘यशोगाथा- नूतन भारतची’ या विशेषांकाचे प्रकाशन व पदवी प्रदान सोहळा मराठी अभिनेत्री चिन्मयी सूमित राघवन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंटिफिक सभागृहात झाला.

जिल्हा परिषदेचे सहायक सीईओ कुणाल उंदीरवाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा मार्गदर्शक डॉ. दर्शना येवतीकर, शिक्षणाधिकारी निलेश मेश्राम, भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी, सहसचिव अतुल गाडगे, नूतन भारतच्या मुख्याध्यापक डॉ. वंदना बडवाईक, भारत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक राजश्री चव्हाण तसेच किशोर मासुरकर व्यासपीठावर उपस्थित होते. Chinmayi Sumeet Raghavan मराठी शाळेची सदिच्छा दूत असून शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. वडील प्रशासकीय अधिकारी तर आई मानसशास्त्राची शिक्षिका होती. अधिकार्यांची मुले इंग‘जी शाळेत घातली जायची त्या काळात आम्ही 2 मुली (बहीण) मराठी शाळेत शिकायचो. मराठी वातावरणात वाढल्याने मुक्कामी पोहचलो, असे चिन्मयी राघवन यांनी प्रारंभीच नमूद केली.
अभिनेते, अधिकारी, नेते यांनी मुलांना इंग्रजी शाळेत घातले तर मराठी शाळेत जाणार कोण, असा सवाल करीत त्या म्हणाल्या की, संस्कृतीची मुख्य वाहक ही भाषा असते. आपली संस्कृती, भाषा ही प्रवाही असली पाहिजे. मराठीचा अट्टाहास नको. पण, अगदीच सोडत ठेवायलाही नको. जागतिक व्यवहाराची भाषा इंग्रजी मुळीच नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितले. अगदीच अडीच वर्षांच्या मुलाला इंग‘जी भाषेत शिक्षण देण्याने त्याच्यावर ताण वाढतो. यात दोष पालकांचाच आहे. मराठीतून शिक्षण सहज व आनंददायी असल्याचे त्या म्हणाल्या. याच शैक्षणिक सत्रापासून शाळेत बालवाडी ते चवथीपर्यंतच्या मुलांसाठी ‘स्पोर्ट्स नर्सरी’ सुरू होणार असल्याचे पल्लवी धात्रक यांनी जाहीर केले. कुणाल उंदीरवाडे यांचेही भाषण झाले. रमेश बक्षी यांनी त्यांच्या भाषणात संस्था व क‘ीडा यांचे नाते तसेच खेळाडू घडवण्यावर प्रकाश टाकला. विशेषांक प्रकाशनात दै. तरुण भारतच्या सहकार्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. संचालन डॉ. मानसी कोलते, आभार प्रदर्शन राजश्री चव्हाण यांनी केले. प्रारंभी शाळेतील शिक्षकांच्या गाण्याचा कार्यक‘म झाला. विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या सं‘येने उपस्थित होते.