पोलिसांच्या गोळीबारात भारतीय व्यक्तीचा मृत्यू

26 Apr 2024 18:56:25
न्यू यॉर्क, 
अमेरिकेत एका 42 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला सॅन अ‍ॅण्टोनियो येथे पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले. Sachin Kumar Sahu सचिन कुमार साहू असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे उत्तरप्रदेशचे आहेत. प्राथमिक तपासानुसार, टेक्सासमधील सॅन अ‍ॅण्टोनियो शहरात गत 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास सचिन साहू यांनी हेतुपुरस्सर वाहनाने एका 51 वर्षीय महिलेला धडक दिली होती.
 
 
America Police
 
 
याचदरम्यान सॅन अ‍ॅण्टोनियोचे दोन पोलिस अधिकारी साहू यांना अटक करण्याच्या प्रयत्नात होते. साहू घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नांत असतानाच पोलिस अधिकारी टायलर टर्नर यांनी Sachin Kumar Sahu सचिन कुमार साहूवर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पीडित महिलेला गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सचिन कुमार साहू यांचा गत आठवड्याच्या शेवटी पोलिसांशी झालेल्या भांडणादरम्यान झालेल्या गोळीबारात अनेक जखमांमुळे मृत्यू झाला, असे सॅन अ‍ॅण्टोनियो एक्सप्रेस न्यूजने वृत्त दिले आहे.
Powered By Sangraha 9.0