पंजाबमधून पकडलेल्या दोघांना पोलिस कोठडी

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
- सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण
 
मुंबई, 
Salman Khan house shooting case : अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी पंजाबमधून अटक केलेल्या दोघांना मुंबईतील न्यायालयाने शुक‘वारी 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सुभाष चंदर आणि अनुज थापन यांना दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. गोळीबार करणार्‍यांना शस्त्रेे आणि काडतुसे पुरवणार्‍या या दोघांना गुन्हे शाखेने गुरुवारी पंजाबमधून अटक केली.
 
 
Salman Khan House
 
पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी हे या गुन्ह्यातील सूत्रधार आहेत आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शस्त्रे कोणी पुरवली हे शोधण्यासाठी त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे आणि यापूर्वी अटक केलेल्या दोन शूटर्सना ती देण्यास सांगितले, असे पोलिसांनी सांगितले. सागर पाल आणि विकी गुप्ता या शूटर्सना दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि 38 जिवंत काडतुसे देण्यासाठी चंदर आणि थापन 15 मार्च रोजी मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे आले होते, असा पोलिसांचा आरोप आहे.
 
 
Salman Khan house shooting case : न्यायालयाने गुरुवारी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या चार आरोपींव्यतिरिक्त पोलिसांनी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांना या प्रकरणात वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केले आहे. आरोपींची बाजू मांडताना अ‍ॅड. अजय दुबे यांनी सांगितले की, चंदर आणि थापन यांनी अन्य आरोपींना शस्त्रे दिली नाहीत किंवा पनवेलला गेले नाहीत आणि त्यांचा बिश्नोई टोळीशी संबंध नाही.