माफीबहाद्दर, आणखी किती माफी मागणार?

Sharad Pawar-Election 2024 जिंकणाऱ्या घोड्यालाच मत

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
प्रासंगिक
 
 
- मोरेश्वर बडगे
 
 
Sharad Pawar-Election 2024 या लोकसभा निवडणुकीत शिल्लक राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार जेवढे उघडे पडले तेवढे ते त्यांच्या ५० वर्षांच्या राजकारणातही पडले नसतील. संदिग्धता हे शरद पवार यांचे नैसर्गिक स्वभाव वैशिष्ट्य. आपल्या गूढ आणि संदिग्ध वागण्याने पवार इतकी वर्षे राजकारणात टिकले खरे; मात्र त्यांची विश्वासार्हता गेली. Sharad Pawar-Election 2024 आपल्या अनेकार्थी विधानांनी अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी झुलवत ठेवले; पण स्वतःभोवती संभ्रमाचे जाळे विणून शेवटी स्वतःच त्यात गुरफटण्याच्या वृत्तीमुळे आज महाविकास आघाडीतला सर्वात शेवटच्या क्रमांकाचा पक्ष सांभाळण्याचे संचित त्यांच्या नशिबी आले आहे. शरद पवारांची माणसं फुटत नाहीत, असे म्हटले जायचे. Sharad Pawar-Election 2024 आता पवारांचे जहाजच फुटले आहे. पवारांची ही शोकांतिका आहे. सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत तर शरद पवार आपल्या चुकांबद्दल चक्क माफी मागत सुटले आहेत. महाआघाडीच्या सभेत त्यांनी अमरावतीकरांची माफी मागितली. गेल्या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना पाठींबा दिला होता. Sharad Pawar-Election 2024 पुढे त्या भाजपाच्या जवळ गेल्या. आज राणा महायुतीच्या उमेदवार म्हणून लढत आहेत. नवनीत राणा यांना पाच वर्षांपूर्वी पाठींबा दिला ही चूक झाली, त्याबद्दल माफी मागायला आपण आलो आहोत, असे पवार म्हणाले.
 
 
 
Sharad Pawar-Election 2024
 
 
Sharad Pawar-Election 2024 पवारांनी कोणाची माफी मागायची ही पहिली वेळ नाही. हा ‘डायलॉग' पवारांनी या आधीही ऐकवला आहे. उदयनराजे यांनी पवारांना सोडले तेव्हाही पवार म्हणाले होते, ‘‘सातारकरांनो, मला माफ करा.'' अगदी अलिकडची गोष्ट सांगतो. पुतण्या अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्ष फुटला. अनेक सहकारी सोडून गेले. छगन भुजबळ हे त्यातलेच एक. सहकारी म्हणजे घरगडी नाही. आयुष्यभर त्याने सोबत राहावे, अशी अपेक्षा कशी करता येईल. पण भुजबळ सोडून गेले, याचा पवारांना किती राग यावा? राष्ट्रवादी फुटल्यानंतरची पहिली सभा त्यांनी येवल्यात घेतली. प्रायश्चित्त घेण्यासाठी आपण आलो आहोत, असे पवार म्हणाले. Sharad Pawar-Election 2024 निवडणुकीचे आणखी दोन टप्पे बाकी आहेत. पवार आणखी किती माफी मागणार, हा प्रश्नच आहे. आपण सेक्युलर आहोत. आपण देव देव करीत नाही, असा आव आणणाऱ्या पवारांनी मुलीच्या प्रचाराचा नारळ मारुतीच्या मंदिरात दर्शन घेऊन फोडला. अजून किती किती आणि कोणा कोणाची पवार माफी मागणार आहेत? सुरुवात करायची म्हटले तर त्यांना पाठीत खंजीर खुपसल्याबद्दल वसंतदादांची माफी मागावी लागेल. घरच्या सुनेला परकी म्हटल्याबद्दल सुनेत्रा पवारांची माफी मागावी लागेल. Sharad Pawar-Election 2024 बारामतीचा निकाल उलट लागला तर मुलीची माफी मागावी लागेल. आयुष्याच्या संध्याकाळी शरद पवारांसाठी फक्त आणि फक्त माफी मागणेच शिल्लक उरले आहे. पेरलं तेच उगवणार. नियतीचा न्याय म्हणतात तो असा !
 
 
 
सध्या विदर्भ ‘इलेक्शन मोड'मध्ये आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान आटोपलं. २६ एप्रिलला दुसèया टप्प्याचं मतदान होत आहे. देशाचा मूड विदर्भात कळतो, असे म्हणतात. गेल्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती होती. आता सारा गोंधळात गोंधळ आहे. शिवसेना फुटली आहे. Sharad Pawar-Election 2024 उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसही फुटला आहे. शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत आहेत. विरोधकांची महाआघाडी आणि भाजपा, शिंदे गट व अजितदादा गट यांची महायुती असा मुकाबला आहे. दोन आघाड्या आमनेसामने असल्या, तरी प्रत्यक्षात सहा पक्ष मैदानात आहेत. उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक ‘तुतारी' फुंकतील? काँग्रेसवाले ‘मशाल' हातात घेतील? राजकारणाची विचित्र प्रयोगशाळा बनले आहे आपले राज्य. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. त्यातल्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे ‘टार्गेट' महायुतीने ठेवले आहे. विदर्भात लोकसभेच्या १० जागा आहेत. Sharad Pawar-Election 2024 गेल्या निवडणुकीत युती होती आणि संपूर्ण राज्यात काँग्रेसला केवळ चंद्रपूरची एक जागा जिंकता आली होती. यावेळी युती नाही. नरेंद्र मोदी या एकाच नावावर भाजपा लढतो आहे. उमेदवार कोण? हा विषय गौण ठरतो आहे. मोदींना मत द्यायचे आहे, असाच एकूण सूर आहे.
 
 
 
गेल्या दोन निवडणुकांमध्ये मोदी सरकारने केलेली कामे लोकांपुढे आहेत. त्यामुळे विरोधकांच्या उलट्या प्रचाराला लोक बळी पडणार नाहीत. Sharad Pawar-Election 2024 खूप बदलला आहे महाराष्ट्र. गेल्या १० वर्षांत बदललेले नागपूर लोक अनुभवत आहेत. १० वर्षांपूर्वी नागपूर हे झोपलेले खेडे होते. हिवाळ्यात विधानसभा आली की तेवढे दोन आठवडे नागपूर जागायचे. आता नागपूरचा चेहरा बदलला आहे. इथे जागतिक दर्जाच्या संस्था आल्या आहेत. विकासाची तहान भागवण्याची संधी नागपूरला मिळाली आहे. तिचे सोने इथल्याच लोकांना करायचे आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसने सहानुभूतीचा मुद्दा लावून धरला आहे, पण तो चालणार नाही. सहानुभूतीच्या नादात पुढची पाच वर्षे रडायची लोकांची तयारी नाही. Sharad Pawar-Election 2024 पूर्वी महाराष्ट्राचे राजकारण पश्चिम महाराष्ट्रातून चालत असे. आज राजकारणाचा रिमोट कंट्रोल नागपूरचे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. नागपूर हे केवळ कुंकवापुरते उपराजधानीचे शहर राहिलेले नाही. सत्तेचे ‘पॉवर सेंटर' झाले आहे. हे कुठे लपून नाही. लोक पाहताहेत. जे पाहताहेत तेच ते करतील. विरोधक जातीची गणिते मांडत असले, तरी ती चालणार नाहीत. ‘एनडीए' विदर्भातील दहाही जागा जिंकेल. हा अंडर करंट आहे. नागपुरात नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा निवडून येत आहेत. गेल्या वेळेपेक्षा त्यांचा लीड वाढणार आहे. विदर्भाची हवा गडकरी यांच्याभोवती फिरते. Sharad Pawar-Election 2024 आपले मत फुकट जावे, हे कुठल्याही मतदाराला आवडणार नाही. तो जिंकणाऱ्या घोड्यालाच मत टाकणार. तो दहा जणांचे ऐकेल, पण मत कमळाला टाकेल.
 
 
देशात भाजपा आणि त्यांच्या ‘एनडीए'ने ‘चारसौ पार'चा नारा दिला आहे. भाजपा देशात किती जागा घेणार? हाच सध्या चर्चेचा विषय आहे. भाजपा आणि त्यांचा ‘एनडीए' १६० जागांमध्ये संपेल, असे राहुल गांधींनी भाकीत केले खरे; पण देशाचा मूड भाजपा आणि नरेंद्र मोदी यांना हॅट्ट्रिक देण्याचा स्पष्ट दिसतो आहे. विरोधकांकडे नेतृत्वच नाही. Sharad Pawar-Election 2024 त्यामुळे राहुल गांधी यांचा चेहराच काँग्रेस पुढे करीत आहे. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे वळण निवडणुकीला मिळते तेव्हा भाजपाचा फायदा होतो, असा गेल्या दोन निवडणुकांचा अनुभव आहे. यावेळीही तेच होणार. महागाई, बेरोजगारी हे जुने झालेले मुद्दे विरोधक लावून धरत आहेत. ते चालणार नाहीत, हे लक्षात आले तेव्हा त्यांची भाषा बदलली. मोदी देशाची घटना बदलवणार आहेत. त्यासाठी त्यांना ४०० जागा हव्या आहेत, असा प्रचार विरोधकांनी सुरू केला आहे. तोही टिकणारा नाही. प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तरी तेही घटना बदलवू शकणार नाहीत, असे मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. Sharad Pawar-Election 2024 विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी जनतेचा मागेच निर्णय झाला आहे. लोक हुशार झाले आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे राजकारण भंगारात गेलेले दिसेल. मोदी की राहुल गांधी? असा प्रश्न येतो तेव्हा त्याचे उत्तर ‘मोदी' हेच येते. ४ जूनला याची साक्ष पटेल.