मंडपात जाण्यापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
Ralegaon Assembly लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा महत्वाचा प्रसंग. पण त्याहून महत्वाचे असते देशाप्रती असलेले कर्तव्य. हेच कर्तव्य लक्षात ठेवत राळेगाव विधानसभेतील कोच्ची येथील एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. शंकर लांडगे असे त्या तरुणाचे नाव असून तो गृहरक्षक दलात कार्यरत आहे. अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी अशा वेशातील एक तरुण मतदान केंद्रावर येताच सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या होत्या. नवरदेवाचा हा उत्साह पाहून लोकं त्याचे कौतुक करत आहेत.
 
 
Ralegaon Assembly
 
लोकशाहीसाठी योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केले असे शंकरने आवर्जून सांगितले. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहनही त्याने नागरिकांना केले. Ralegaon Assembly लोकसभेच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून विदर्भात शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान पार पडले. सकाळपासूनच महिला, तरुण, म्हातारे, मध्यमवयीन नागरिक, मतदानासाठी सर्वजण उत्साहाने बाहेर पडले आहेत. एवढंच नव्हे तर दिव्यांग नागरिकही त्यांचे मतदानाचे कर्तव्य बजवाताना दिसत आहेत.