वर्धेत 5 वाजेपर्यंत 56.67 टक्के मतदान

26 Apr 2024 17:51:09
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Wardha polling वर्धा लोकसभा मतदार संघात सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56. 67 टक्के मतदान झाले. महिलांमध्ये मतदानाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी होती. आर्वी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 60. 85 टक्के मतदान झाले.
 

wardha 
 
धामणगाव येथे 53. 58 टक्के, मोर्शी 57. 60, आर्वी 60. 85, देवळी 57. 11, हिंगणघाट 55. 48 आणि वर्धा विधानसभा क्षेत्रात 56. 06 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 56. 67 टक्के मतदान झाले.Wardha polling उन्हाचा पारा कमी होताच मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. अखेरच्या दोन तासातील मतदाराची टक्केवारी सर्वाधिक राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0