यंदा महागाईचा दर आटोक्यात

26 Apr 2024 20:10:17
- अर्थमंत्रालयाचा अहवाल
 
नवी दिल्ली, 
inflation rate : देशात यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल, असे भाकीत आहे. यामुळे कृषी उत्पादनात वाढ होऊन खाद्यपदार्थांची महागाई कमी होईल. सामान्यांना यावर्षी महागाईची झळ सोसावी लागणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. किरकोळ महागाई दरात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मोठी घट नोंदविण्यात आली असून, ती कोरोना काळातील नीचांकी पातळीवर आहे. याचवेळी खाद्यपदार्थांचा महागाई दर मार्चमध्ये 8.5 टक्क्यांवर आला आहे. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात तो 8.7 टक्के होता, असे अहवालात म्हटले आहे.
 
 
Mahagai
 
inflation rate : केंद्र सरकारने आखलेल्या धोरणामुळे आगामी काळात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढणार असून व्यापारी तूट कमी होणार आहे. तसेच रुपयाच्या मूल्यात घसरण होणार नाही. जागतिक पातळीवर आव्हाने असली तरी भारताची आर्थिक कामगिरी अंदाजापेक्षा अधिक चांगली राहणार आहे. सर्वच क्षेत्रात वाढ होणार असल्याने अर्थव्यवस्थेचा विस्तार होईल. याचबरोबर जागतिक वाढीलाही भारत गती देईल. भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आंतरराष्ट्रीय संस्था आणि रिझर्व्ह बँकेने सकारात्मक अनुमान वर्तविले असल्याचे अहवालात नमूद कऱण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0