मना ! अंतरी सार विचार राहो !

psychoanalysis-counselling शल्यक्रिया करणारे शास्त्र !

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
अथा तो जीवन जिज्ञासा 
 
 
- प्राचार्य प्रमोद डोरले
 
psychoanalysis-counselling काही वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संस्थेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी जागतिक स्तरावर विविध व्याधींनी ग्रस्त आणि त्रस्त असलेल्या रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यात त्यांनी ‘मनोरुग्ण' या व्याधीचाही समावेश केला होता. कारण इतर महत्त्वाच्या व्याधींसोबत म्हणजे क्षय, कॅन्सर, मधुमेह या रोगांबरोबरच ‘मनाने आजारी असलेल्या' रुग्णांचाही त्यांना त्यात समावेश करावा लागला होता. psychoanalysis-counselling कारण, गेल्या अनेक दशकांपासून पाश्चात्त्य देशांमध्ये विविध मानसिक विकृतीने त्रस्त असलेल्या मनोरुग्णांची संख्या वाढते आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांनी उपचार पद्धती शोधून काढली. त्यालाच आधुनिक परिभाषेत ‘सायकोथेरपी' असे म्हणतात. psychoanalysis-counselling त्यात तज्ज्ञ असलेल्याला, पारंगत असलेल्या व्यक्तीला ‘सायकॅटॅरिस्ट' म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ असे म्हणतात. तो जी उपचार पद्धती (मेथड) वापरतो, त्याला ‘कौन्सिलिंग'  म्हणजे ‘समुपदेशन' असे म्हणतात. त्या संकल्पनेचा अर्थ, व्याप्ती नीटपणे लक्षात घेतल्याशिवाय आजच्या आधुनिक परिस्थितीच्या संदर्भात भारतीय तत्त्वज्ञानाचा, धारणेचा, विचारपद्धतीचा, जीवनपद्धतीचे महत्त्व आणि अर्थ आपल्या लक्षात येणार नाही.psychoanalysis-counselling
 
 
psychoanalysis-counselling
 
 
psychoanalysis-counselling समुपदेशन म्हणजे काय? : मानसिक व्यथांनी, समस्यांनी त्रस्त झालेल्या व्यक्तीच्या संबंधात योग्य त्या पद्धतीने त्याचे ‘मनोविश्लेषण (सायकोअ‍ॅनेलिसीस) करून त्याला आवश्यक व परिणामकारक सल्ला देणे वा मार्गदर्शन करणे याला ‘समुपदेशन' असे म्हणतात. या उपचार पद्धतीचा मुख्य आधार म्हणजे ‘मानवी मन'च आहे. त्याच मनाशी योग्य त्या पद्धतीने ‘संवाद' (कौन्सिलिंग) करून त्याला ताळ्यावर आणणे, ठिकाणावर आणणे म्हणजे ‘समुपदेशन' करणे होय. श्री समर्थांच्या भाषेत सांगायचे म्हणजे ‘मानित-मानित घालावे मुळाकडे' म्हणजे आपल्या मूळ स्थितीपासूनच ढळलेल्या, भरकटलेल्या, विचलित झालेल्या मनाला स्थिर, शांत, संयमित स्वरूपात प्रस्थापित करणे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्राप्रमाणे याचेही तंत्र, पद्धती, शास्त्र निर्माण करण्यात आले. इतर शास्त्रांप्रमाणे ते शास्त्रही ‘सायकोथेरपी' या आधुनिक नावाने परिचित झाले आहे. संपूर्ण जगात आज यासाठी अनेक मानसोपचार केन्द्रे स्थापित झाली आहेत. अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी, आयुर्वेद, नॅचरोपॅथी या उपचार पद्धतीच्या रांगेत आता ‘सायकोथेरपी, ‘योग थेरपी' याही प्रस्थापित झाल्या आहेत. आधुनिक जागतिक अनुकरणप्रियतेच्या वावटळीत सापडलेल्या भारतातही आता अनेक समुपदेशन केन्द्रे स्थापन झाली आहेत.
 
 
 
 
psychoanalysis-counselling कारण आम्हाला जगाबरोबर चालले पाहिजे ना! त्यात मागे राहून कसे बरे चालेल? यालाच स्वामी विवेकानंदांनी परकीयांचे ‘अंधानुकरण' म्हटले आहे. याचा अर्थ आधुनिकतेला टाळणे, जीवनोपयोगी शास्त्रांकडे दुर्लक्ष करणे, भारतीयत्वाच्या अभिनिवेशात त्याचा दुस्वास करणे असा नाही तर पाश्चात्त्य देशाला या मानसिक उपचारांची गरज का भासली वा त्यांना या समुपदेशनाची गरज का आहे, याचा मुळात जाऊन विचार करणे, चिंतन करण्याची खरी आवश्यकता आहे. त्या मूलभूत चिंतनातून हाती आलेल्या निष्कर्षावरून वा सद्यपरिस्थितीत चैतन्याधिष्ठित मनाचे- भौतिक शास्त्राच्या जड चौकटीप्रमाणे एखादे ‘शास्त्र' निर्माण करता येऊ शकते का? याचाच मूलभूत (बेसिकली) विचार करण्याची आज खरी गरज, खरे आव्हान निर्माण झाले आहे. त्याचे स्वरूप १७ व्या शतकापासून भौतिक विज्ञानाच्या नावेचे सुकाणू ज्यांचे हाती आहे असे अनेक संशोधक शास्त्रज्ञ आता स्पष्ट करू लागले आहे. ते स्वरूप स्पष्ट करताना न कळत त्यांची असमर्थता प्रकट होते आहे. शास्त्राचे अपुरेपण सिद्ध होते आहे. त्याचा अहवाल प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्याकडूनच ऐकलेला बरा!
 
 
psychoanalysis-counselling ‘मनाचे' परतलेले भान : डॉ. एरिक फ्रॉम हे संशोधन क्षेत्रात एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांचे स्पष्ट म्हणणे असे आहे की, ‘युरोपात पुनर्जागरणाच्या (रेनासन्स) काळात जो वैचारिक बदल झाला, त्यानंतर भौतिक विज्ञानाचे जे प्रस्थ वाढले, माहात्म्य वाढले, त्याचा परिणाम म्हणून जीवनाच्या विविध क्षेत्रांतील अनेक शास्त्रे त्याचे अनुसरण करायला लागलीत. त्यात सूक्ष्म असलेल्या ‘मनस् तत्त्वाचेही' (माईंड स्टफ) त्यांनी शास्त्र (सायन्स) निर्माण केले आणि मग त्यातून अनेक ‘थेरपीज' निर्माण झाल्यात... ‘अ‍ॅकॅडेमिक सायकॉलॉजी ट्राईंग टु इमिटेट द नॅचरल सायन्सेस अँड लॅबॉरेटरी मेथड्स' या प्रकाराने उच्चांक गाठला; ज्याच्यामुळे या प्रकाराला विश्वमान्यता मिळाली. ती घटना म्हणजे डॉ. अँटोनियो डि एजेस या शास्त्रज्ञाला ‘सायको सर्जरी' (लोबोटॉमी) या अत्याधुनिक विज्ञान संशोधनाबद्दल १९४९ सालचे नोबल पारितोषकही देण्यात आले. (सायको-लोबोटॉमी) हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर हा विज्ञान क्षेत्रातील प्रचंड विरोधाभासच नाही का? असे आपले तर्कशुद्ध मत काही शास्त्रज्ञांनी मांडले आहे. ते म्हणतात- ‘‘ज्या मनाचे अस्तित्व दिसत नाही, फक्त जाणवते, जे अखंडपणे संकल्प-विकल्पाच्या, मनोरथांच्या उतरंडी रचत व पाडीत असते, वाऱ्याहूनही जे चपळ आहे आणि पाण्याहूनही जे तरल आहे. ज्याचे अस्तित्व ‘पाहो जाता सर्वां ठायी- पाहो जाता कोठे नाही' असे अनिश्चित प्रकारचे आहे, जे पकडता येत नाही आणि ज्याच्याशिवाय जीवनवृक्षाचे पानही हलत नाही, अशा मनाची ‘ऑपरेशन टेबलशिवाय' आणि ‘सर्जिकल इन्ट्रमेंटशिवाय; शल्यक्रिया करणारे शास्त्र!
 
 
 
psychoanalysis-counselling हा एक फार मोठा विरोधाभासच-‘कॉन्ट्रॉव्हर्सी बिटवीन माईंड अँड मॅटर' म्हणावा लागेल, अशी स्पष्ट प्रतिक्रिया अनेक विचारवंत, संशोधक देऊ लागले आहेत. याचा सरळ अर्थ हाच आहे की, मनालाच ‘मनाचे' भान येऊ लागले आहे.'' भौतिक विचाराकडून - आध्यात्मिक विचाराकडे : १७ व्या शतकापासून वैज्ञानिक क्षेत्रात प्रस्थापित झालेल्या गणितीय पद्धतीच्या ‘कारण आणि कार्य' (कॉझ अ‍ॅण्ड इफेक्ट) पद्धतीनुसार प्रस्थापित झालेली वरील मनोविश्लेषणात्मक समुपदेशन पद्धतीला मानवी मनाचे पूर्ण आकलन होऊच शकत नाही, हे सत्य या क्षेत्रात काम करणाèया संशोधकांना, शास्त्रज्ञांना आता उमगू लागले आहे, समजू लागले आहे. भौतिक आणि जडाच्या माध्यमातून अभौतिक, अजड म्हणजे चैतन्याधिष्ठित ‘मनाचे' आकलन कसे शक्य आहे? अशी त्यांची अनेक वर्षांच्या अनुभवातून प्राप्त झालेली अनुभूती आहे आणि ते सत्याचा निखळ शोध घेणाऱ्या विज्ञानपथावरील यात्रिक असल्याने प्रामाणिक आहे. प्रांजळपणे त्यांनी ही वस्तुस्थिती स्वीकारली आहे. यालादेखील मनाची हिंमत लागते. ती त्यांच्याजवळ आहे. प्रातिनिधिक स्वरूपात काही मान्यवरांचे विचार पाहायला हरकत नसावी. अ‍ॅर्नाल्ड टॉयन्बी हे जगप्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत आहेत. ते म्हणतात- ‘‘१७ व्या शतकापासून आपण विज्ञानाने प्रस्थापित केलेल्या गणितीय पद्धतीच्या ‘कारण आणि कार्य' (कॉझ अ‍ॅण्ड इफेक्ट) या विचार पद्धतीनेच वाटचाल करीत आलो आहे.
 
 
 
psychoanalysis-counselling पण आता ती वेळ आली आहे की, त्या विचारसरणीतून कसेही करून आपण आपली सुटका, सोडवणूक करूनच घेतली पाहिजे.'' (टु रेंच आवर सेल्वज् आऊट ऑफ द सेव्हंटीन्थ सेंच्युरी मॅथेमॅटिकोफिजिकल लाईन ऑफ अ‍ॅप्रोच वुईच वुई आर स्टिल फॉलोईंग ) आणि पुढचे त्याचे महत्त्वाचे विधान आहे की, ‘टु मेक अ फ्रेश स्टार्ट फ्रॉम स्पिरिच्युअल साईड-'(हिस्टोरियन्स अ‍ॅप्रोच टु रिलिजन, पृ. क्र. २४४) वरील विचारवंतांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या विचारांमध्येच जागतिक विचार विश्वात, मानसिक विश्वात कसा बदल होतो आहे, वारे कोणत्या दिशेने वाहू लागले आहे, याच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून राहिल्या आहेत. मानवी जीवनाचे, ते नियंत्रित करणाऱ्या मानवी मनाचे खरे स्वरूप व संशोधन जड भौतिक पद्धतींनी होऊच शकत नाही तर त्यासाठी आध्यात्मिक विचारांकडेच वळावे लागेल. नाही तर आजच्या आत्यंतिक भौतिकवादाने आपल्या मूळ स्वरूपापासून भटकलेले, विचलित झालेले मन भस्मासुराप्रमाणे आपल्याच डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही... तसेही आपण त्या मनरूपी भस्मासुराचे तांडव रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, तालिबान-पाकिस्तान यांच्या संघर्षाने अनुभवतो आहोतच की!