अमरावती मतदारसंघात 64.2 टक्के मतदान

27 Apr 2024 10:29:39
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Amravati constituency अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार 26 एप्रिल रोजी मतदान झाले. सदर मतदानाची अंतिम टक्केवारी प्राप्त झाली असून एकूण 64.02 % मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा चार टक्क्यांनी मतदान वाढले आहे. सर्वाधिक मतदान मेळघाट मतदार संघामध्ये झाले आहे.
 
 
Amravati constituency
 
यंदा लोकसभेसाठी 61 ते 62 टक्के मतदान होण्याचा अंदाज होता. त्या अंदाजा पेक्षाही दोन टक्के मतदान जास्त झाले आहे. Amravati constituency बडनेरा मतदारसंघांमध्ये 55.78 %, अमरावती मतदारसंघांमध्ये 57.51 %, तिवसा मतदारसंघांमध्ये 64.14 %, दर्यापूर मतदारसंघांमध्ये 68.88 %, मेळघाट मतदार संघामध्ये 71.02 %, अचलपूर मतदार संघामध्ये 68.84 % मतदान झाले आहे. वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0