पीएफआयवरील बंदीला कधीच विरोध नव्हता

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
- भाजपाच्या आरोपावर दिग्विजय सिंह यांचे प्रत्युत्तर
 
भोपाळ, 
भाजपाने माझा संबंध अतिरेकी संघटनेशी असल्याचे अनेकदा आरोप केले. संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरू याच्या फाशीच्या शिक्षेवर मी कधीच आक्षेप घेतला नाही. तरीही प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह माझ्यावर अतिरेकी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयसह स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाची (सिमी) बाजू घेत असल्याचे आरोप करतात. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून मी या संघटनांवरील बंदीचा कधीच विरोध केला नसल्याचे काँग्रेस नेते Digvijay Singh दिग्विजय सिंह म्हणाले.
 
 
Digvijay Singh
 
Digvijay Singh : मध्य प्रदेशच्या राजगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रोडमल नागर यांच्या प्रचारासाठी खिचलीपूर येथील प्रसारसभेत शाह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सिंह म्हणाले, देशविरोधी कारवायात सहभागी कुठल्याही संघटनेला काँग्रेसचा पाठिंबा नाही. मुख्यमंत्रिपदावर असताना मध्य प्रदेशात सिमी या संघटनेवर मी बंदी घातली होती. आमच्यावर अतिरेक्यांप्रती सहानुभूती दाखवल्याचा आरोप केला जातो. मात्र तो साफ खोटा आहे. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला देशद्रोही असल्याच्या नजरेने पाहणे योग्य नाही. काँग्रेसच्या घोषणापत्रात मुस्लिम तरुणांना वैयक्तिक कर्ज देण्याचा उल्लेख आहे. मात्र यावरून शाह वेगळाच अपप्रचार करीत आहे. आमच्या पक्षातील कुणीही भगवा दहशतवाद शब्दाचा वापर केलेला नाही. आम्ही अतिरेकी अफजल गुरूला तत्काळ फाशी व्हावी अशी मागणी केली होती. माझ्यावर वैयक्तिकरीत्या कोरोना लसीला विरोध केल्याचा आरोप केला जातो. मात्र मी स्वत: कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिल्याचे सांगत शाह यांनी केलेले आरोप त्यांनी खोडून काढले.