नवी दिल्ली,
Drug traffickers : ड्रग्ज तस्कर प्रकरणातील आरोपीला अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने बेकायदेशीर सावकारी प्रकरणात उत्तराखंडच्या हलद्बानी येथून अटक केली. परविंदर सिंग असे आरोपीचे नाव असून तो आंतरराष्ट्रीय तस्कराच्या संपर्कात होता. तसेच तो ‘द सिंग ऑर्गनायझेशन’ नावाने ग्रुप चालवायचा. डार्क वेब लिंक्सचा वापर करून तो मादक पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली.
Drug traffickers : अमेरिकेच्या मादक पदार्थविरोधी पथकाने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर टोळीचा भंडाफोड करण्यासाठी ईडी अधिकार्यांशी संपर्क करून मदत मागितली होती. तसेच आरोपी परविंदर सिंग याची माहिती दिली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री ईडीने त्याच्या हलद्बानी येथील निवासस्थानी छापा टाकला. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. ड्रग्जच्या विक्रीतून मिळालेला पैसा तो आंतरराष्ट्रीय तस्करांना पाठवत असल्याचे समोर आले आहे. शनिवारी त्याला ईडी विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायधीशांनी तीन दिवसांनी कोठडी सुनावली आहे.