- कोट्यवधींची जप्ती
ठाणे,
Drug trafficking : मादकपदार्थांच्या तस्करीचे रॅकेट चालवल्याच्या आरोपात पोलिसांनी शनिवारी नवी मुंबईत कारवाई करीत नायजेरियाच्या 11 नागरिकांना अटक करीत त्यांच्या ताब्यातून कोकेनसह इतर मादकपदार्थ जप्त केले. त्याचे मूल्य 1.61 कोटी रुपये आहे, अशी माहिती अधिकार्याने दिली.
शुक्रवारी केलेल्या छापेमारीनंतर हे अटकसत्र राबविण्यात आले. नवी मुंबईच्या वाशी येथील कोपरीगावात काही नायजेरियन नागरिक मादकपदार्थांचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने शुक‘वारी दुपारी तीन वाजता एका सदनिकेवर छापेमारी केली आणि मादकपदार्थ जप्त केले, असे पोलिस अधिकार्याने सांगितले.
Drug trafficking : या मोहिमेत 30 ते 50 वयोगटातील नायजेरियाच्या 11 नागरिकांना शनिवारी पहाटे अटक करण्यात आली. जप्त केलेल्या मादकपदार्थांत बहुतांश कोकेनचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मेफेड्रोन आणि एमडीएमएही जप्त करण्यात आले. याचे एकूण मूल्य 1.61 कोटी रुपये आहे. छापेमारीत मोबाईल आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली. त्याचे मूल्य जवळपास 25 लाख रुपये आहे.