सांगलीच्या खेळीचे खलनायक जयंत पाटील

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
- काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप
 
सांगली, 
सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडे जाऊ नये म्हणून काहींनी षडयंत्र रचले, ज्यात मी फसलो अशी कबुली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली होती. अशातच आता सांगलीच्या खेळीचे खलनायक शरद पवार गटाचे नेते Jayant Patil जयंत पाटीलच असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार विलास जगताप यांनी केला आहे.
 
 
patil
 
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील तसेच माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना सांगलीच्या जागेवरून विशाल पाटील यांना डावलण्यामागे Jayant Patil जयंत पाटील यांची खेळी असल्याचे जगताप म्हणाले. महाराष्ट्राची तिकिटे वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची. मात्र आज त्यांच्याच नातवाला दिल्ली, मुंबई, नागपूरचे हेलपाटे घालावे लागतात, ही शोकांतिका आहे. काँग्रेस पक्षाची वाताहत यापूर्वी कधीच झाली नाही. सध्याचे काँग्रेस नेते माना हलविण्याचे काम करीत आहे. त्यांचे स्वत:चे अस्तित्वच उरले नसल्याचा हल्लाबोल यावेळी जगताप यांनी केला. जिल्ह्यातून वसंतदादा घराणे संपवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घातला असल्याचा आरोप त्यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केला आहे.