भाजपा उमेदवार कोटेचांची संपत्ती 7 कोटींनी घटली

27 Apr 2024 18:36:32
- पत्नीकडून घेतले 42 लाखांचे कर्ज

मुंबई, 
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार Mihir Kotecha मिहिर कोटेचा यांची संपत्ती 2019च्या तुलनेत जवळपास 50 टक्क्यांनी घटून ती 7.23 कोटींवर आली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची एकूण संपत्ती 15.17 कोटी इतकी होती. मात्र निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञपत्रानुसार सध्या त्यांची संपत्ती 7.23 कोटी असून त्यात 7 कोटींची घट झाली आहे. तसेच त्यांच्यावर पत्नीचे 42 लाखांचे कर्ज असल्याचेही समोर आले आहे.
 
 
kotecha
 
Mihir Kotecha : कोटेचा यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांनी स्वत:कडे असलेल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार 2019मध्ये विधानसभा लढवताना त्यांच्याकडे 15.17 जंगम तर 3.49 कोटींची स्थावर मालमत्ता होती. तसेच त्यांच्यावर 15.62 कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी दाखल प्रतिज्ञापत्रानुसार, कोटेचा यांची जंगम मालमत्ता 7.23 कोटी रुपये, स्थावर मालमत्ता 3.65 कोटी रुपयांची आहे. कोटेचा यांच्या पत्नीकडे 2.43 कोटी स्थावर मालमत्ता आहे. कोटेचा यांनी पत्नीकडून 42 लाख 65 हजार 228 रुपयांचे कर्ज घेतले आहे. एकूण कर्जाची रक्कम 7 कोटी 37 लाख 95 रुपयांवर आली आहे. तसेच त्यांच्याकडे 80 ग‘ॅम सोने, दीड किलो चांदी व हिरेजडित दागिने आहे.
Powered By Sangraha 9.0