काँग्रेसचा प्रचार करणार नाही : नसीम खान

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
- स्टार प्रचारकपदाचा, प्रचार समितीचा राजीनामा

मुंबई, 
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याने समाजात तीव्र नाराजी आहे. याचे मला वाईट वाटले. समाजाच्या भावनांचा आदर राखत यापुढे आपण काँग्रेसचा प्रचार करणार नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते Naseem Khan नसीम खान यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
 
 
Naseem Khan
 
मुंबईत आयोजित पत्रपरिषद Naseem Khan नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारक आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याचे आणि नाराजीचे कारण सांगितले. तत्पूर्वी, शुक‘वारी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांना पत्र लिहून आपण स्टार प्रचारक आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे कळविले. ज्यातील 48 लोकसभा क्षेत्रांत एकही अल्पसं‘यक उमेदवार देण्यात आला नाही. गेल्या दोन दिवसांपासून विविध अल्पसंख्यक संघटनेच्या नेत्यांनी फोनवरून नाराजी व्यक्त केली आहे. मी काँग्रेसचा नेता आणि कार्यकारी अध्यक्ष असल्याने याबाबतचा प्रश्न मला विचारण्यात येत आहे.
 
 
या प्रश्नांशी मी सहमत असून, या निवडणुकीत अल्पसं‘यकांना का डावलण्यात आले, असा प्रश्न मला पडलेला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेत मी स्टार प्रचारकाचा आणि प्रचार समितीचा राजीनामा दिला, असे Naseem Khan नसीम खान यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्याचा प्रचार केला. यापुढे तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी आपण प्रचार करणार नाही. वर्षा गाकवाड यांना माझ्या मतदारसंघातून उमेदवारी दिली असली तरी, मी त्यांचा प्रचार करणार नाही, असे नसीम खान यांनी सांगितले.
आणखी एक नाराजी
नसीम खान यांची आणखी एक नाराजी आहे. वर्षा गायकवाड यांच्याऐवजी त्यांना लोकसभा लढवायची होती. मात्र, काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले. या नाराजीचा वचपादेखील यानिमित्ताने Naseem Khan नसीम खान यांनी काढला आहे.