संविधानविरोधी काँग्रेसचे मनसुबे उघड झालेत : रामदास आठवले

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
मुंबई, 
सामान्य माणसाने मोठ्या कष्टाने कमवलेली संपत्ती त्याच्या मृत्यूनंतर वारसांना न देता त्यातील 55 टक्के संपत्ती शासनाने ताब्यात घेण्याचा अमेरिकेचा कायदा भारतात राबवून काँग्रेसचे देशवासीयांना लुटण्याचे मनसूबे सॅम पित्रोदा यांनी उघड केले असल्याचा हल्लाबोल रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री Ramdas Athawale रामदास आठवले यांनी केला.
 
 
Ramdas Athawale
 
काँग्रेसचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेचा वारसा कायदा भारतात लागू करण्याचा काँग्रेसला सल्ला दिला. सत्तेत असताना भ्रष्टाचार करून देशाला लुटण्याचा आणि आता मृत्यूनंतर सामान्य माणसाची संपत्ती लुटण्याचा अजब अमेरिकी कायदा आपल्या देशात लागू करण्याचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेसच्या वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. असे Ramdas Athawale आठवले यांनी सांगितले.
 
 
दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियटो फर्नांडिस यांनी गोव्यात भारतीय संविधान जबरदस्ती लागू आहे. गोव्यात भारतीय संविधान लागू करू नका आणि आम्हाला दुहेरी नागरिकत्व द्यावे, ही केलेली मागणी देशात फूट पडणारी आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून भारत तोडोची बीजे पेरली का, त्याचे परिणामस्वरूप गोव्यात काँग्रेस उमेदवार संविधानविरोधी गरळ ओकत आहे. भारत देशाला एकच संविधान आहे आणि ते जगातील सर्वश्रेष्ठ आहे. मग, गोव्याला भारतीय संविधान नको, दुसरे संविधान पाहिजे, ही काँग्रेस उमेदवारांची मागणी काँग्रेसचा संविधानविरोधी चेहरा उघड करीत आहे. असा आरोप Ramdas Athawale आठवले यांनी केला.