अभिनेता साहिल खान फरार घोषित

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
बेटिंग अ‍ॅप प्रकरणी अभिनेता Sahil Khan साहिल खानला फरार घोषित करण्यात आले. यासंदर्भातील वृत्ताला पोलिस अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. सत्र न्यायालयाने त्याची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. साहिल खान मागील आठवड्यात मुंबई पोलिसांसमोर हजर झाला होता. एसआयटीने त्याची तीन तास चौकशी केली होती. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वी त्याची चौकशी केली होती.
 
 
Sahil Khan
 
दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्देश देत त्याची याचिका फेटाळली होती. शुक‘वारी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या घरी भेट दिली होती. तेव्हा तो बेपत्ता असल्याचे समजले. शोधूनही तो सापडला नाही. त्यानंतर Sahil Khan साहिल खानला फरार घोषित केले गेले. पोलिस अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, अभिनेत्याने नागरिकांना बेटिंग अ‍ॅप वापरण्याचे आवाहन करणार्‍या जाहिरातींचा प्रचार केला. महादेव अ‍ॅपचा प्रचार आणि प्रसार करून मोठा नफा कमावला. त्याची याचिका फेटाळताना न्यायालयानेही या गोष्टींची दखल घेतली होती.