सलमानशी पंगा घेणे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला पडले महागात

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
मुंबई,   
Salman Khan बॉलीवूड अभिनेता सलमान खानशी पंगा घेणे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल यांना महागात पडले आहे. 14 एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे येथे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या विरोधात शुक्रवारी 'लूकआउट सर्क्युलर' जारी करण्यात आला आहे.  ...आणि ममता दीदी पुन्हा पडल्या: बघा व्हिडीओ
 

Salman Khan 
 
एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. याशिवाय लॉरेन्सचा त्रासही वाढला आहे. गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला मुंबई पोलीस ताब्यात घेऊ शकतात आणि या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचा विचार करत आहेत. Salman Khan या अधिकाऱ्याने सांगितले की, अनमोल बिश्नोईने या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती आणि तपासात त्याचा सहभागही उघड झाला होता, त्यानंतर मुंबई पोलिसांनी 'लूकआउट परिपत्रक' जारी केले होते. ते म्हणाले, "अनमोल आणि लॉरेन्स बिश्नोई यांची या प्रकरणात वॉण्टेड आरोपी म्हणून नावे आहेत. अनमोल बिश्नोई कॅनडामध्ये राहतो आणि वारंवार अमेरिकेला भेट देतो. त्याने ज्या फेसबुक पोस्टद्वारे गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली त्याचा आयपी पत्ता पोर्तुगालचा निघाला.  
 
त्याचवेळी, मुंबईतील एका न्यायालयाने शुक्रवारी बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी पंजाबमधून अटक केलेल्या दोन आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुभाष चंद्रा (37) आणि अनुज थापन (32) यांना दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्हे शाखेने गुरुवारी दोन्ही आरोपींना पंजाबमधून अटक केली होती. या दोघांवर गोळीबार करणाऱ्यांना शस्त्रे आणि काडतुसे पुरवल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात आरोपींचा सहभाग असून तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.