ठाकरे गटाला ‘जय भवानी’ शब्द वगळावाच लागेल

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
- निवडणूक आयोगाने फेरविचार अर्ज फेटाळला
 
मुंबई, 
Thackeray group 'Jai Bhawani' : ठाकरे गटाच्या प्रचार गीतातील ‘जय भवानी’ शब्द वगळण्याचा आदेश नोटीस बजावून निवडणूक आयोगाने दिला होता. नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आला होता. हा अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावत दिलेला आदेश पाळावाच लागेल असे बजावले.
 
 
Thackeray group 'Jai Bhawani'
 
Thackeray group 'Jai Bhawani' : राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीने ठाकरे गटाचा फेरविचार अर्ज शुक‘वारी फेटाळला आहे. त्यामुळे आता ठाकरे यांना आयोगाचा निर्णय मान्य करावाच लागणार आहे. निवडणूक आयोगाने 24 एप्रिल रोजी एक नोटीस जारी केली. यामध्ये विविध कारणांसाठी काही पक्षांना 39 नोटीस पाठवण्यात आल्या आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गीतासाठी देखील नोटीस बजावण्यात आली. यातील जय भवानी शब्द वगळा असे सांगण्यात आले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना प्रचार गीतातील कोणताही शब्द वगळणार नसल्याचे जाहीर केले होते. तसेच फेरविचार अर्ज आयोगाकडे दाखल केला होता.