अकोला लोकसभेसाठी 61.79 टक्के मतदान

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
- 11 लाख 68 हजार 366 जणांनी बजावला हक्क
- बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान
अकोला, 
akola election अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी प्रशासनाने घोषित केली असून एकूण 61.79 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. बाळापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 66.58 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 54.88 टक्के झाल्याची प्रशासनाने दिली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 56 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. यावेळी अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. नवमतदारांमध्ये विशेष उत्साह होता. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने मतदानाची अंतिम टक्केवारी शनिवार, 27 एप्रिल रोजी प्रशासनाने घोषित केली. यात सर्वाधिक मतदान बाळापूर विधानसभा मतदारसंघात 66.58 टक्के तर सर्वात कमी मतदान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 54.88 टक्के झाले आहे.
 

rtry 
 
akola election लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 90 हजार 814 मतदार संख्या आहेत. त्यात 9 लाख 77 हजार 500 पुरूष, 9 लाख 13 हजार 269 महिला तर 45 इतरांचा समावेश आहे. यातील 11 लाख 68 हजार 366 मतदारांनी मतदान केले. त्यात 6 लाख 34 हजार 116 पुरूष, 5 लाख 34 हजार 239 महिला तर 11 अन्य मतदारांचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार 64.87 टक्के पुरुष, 58.50 टक्के महिला तर 24.44 टक्के इतर मतदारांनी मतदान केले असून मतदानाची एकूण टक्केवारी 61.79 इतकी आहे. आकोट विधानसभा क्षेत्रात एकूण 3 लाख 362 मतदारांपैकी 1 लाख 92 हजार 285 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 64.02 इतकी आहे. बाळापूरमध्ये एकूण मतदार संख्या 3 लाख 662 इतकी असून 2 लाख 177 मतदारांनी आपला हक्क बजावला. ही टक्केवारी 66.58 आहे. अकोला पश्चिम एकूण मतदार संख्या 3 लाख 32 हजार 763, झालेले मतदान 1 लाख 82 हजार 608, टक्केवारी 54.88, अकोला पूर्व एकूण मतदार 3 लाख 40 हजार 802, झालेले मतदान 2 लाख 2 हजार 294, टक्केवारी 59.36, मूर्तिजापूर एकूण मतदार 3 लाख 296, झालेले मतदान 1 लाख 93 हजार 761, टक्केवारी 64.52 तर रिसोड एकूण मतदार 3 लाख 15 हजार 929, झालेले मतदान 1 लाख 97 हजार 241, टक्केवारी 62.43. लोकसभा मतदारसंघात गतवर्षीच्या तुलनेत मतदानात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले.