शेतकर्‍यांना व्याजाची रक्कम मिळणार परत

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
farmers taxमुदतीत पीक कर्जाची परतफेड करणार्‍या farmers tax शेतकर्‍यांकडून व्याजाची रक्कम वसूल करण्यात आली होती. आता ही रक्कम शेतकर्‍यांना परत करण्याचे बजावण्यात आले आहे. तशी सूचना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश टेटे यांनी सर्व शाखा व्यवस्थापकांना दिली आहे.
 

dfdfd 
 
farmers tax  शेती करताना शेतकर्‍यांना आर्थिक अडचणी येऊ नये, यासाठी शासन बँकांमार्फत शेतकर्‍यांना 3 लाखांपर्यंतचे कर्ज विनाव्याज उपलब्ध करून देते. मुदतीत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना व्याज सवलत देण्यात येते. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून राज्य शासन 3 टक्के व केंद्र शासनाकडून 3 टक्के बँकांना परतावा म्हणून मिळायची. 13 फेब्रुवारी रोजी सहकार आयुक्तांनी दूरचित्रवाणीद्वारे घेतलेल्या परिषदेत जिल्हा बँकेला शेतकर्‍यांकडून व्याजासह पीककर्जाची रक्कम वसूल करण्याचे फर्माण सोडले होते. याला शेतकर्‍यांनी प्रचंड विरोध केला. मुळ व व्याजाची रक्कम भरल्याशिवाय पुढील हंगात पीक कर्ज मिळणार नसल्याचे बजावण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी मुळ व व्याजाची रक्कम भरली. शेतकर्‍यांचा वाढता विरोध पाहता शासनाने व्याजासह रक्कम वसूलीचा निर्णय मागे घेतला. ज्या शेतकर्‍यांनी व्याजासह रक्कम भरली त्या शेतकर्‍यांना व्याजाची रक्कम परत करण्याच्या सूचना जिल्हा बँकेचे सीईओ टेटे यांनी सर्व सहाकारी संस्थेचे गटसचिव, शाखा व्यवस्थापक, यांना दिले आहे. ही रक्कम शेतकर्‍यांनाच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे.