रांचीमध्ये स्कूल बस उलटून 15 मुले जखमी

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
रांची :
school bus accident : येथे शनिवारी सकाळी शाळेची बस उलटल्याने 15 मुले जखमी झाली. मंदार येथील सेंट मारिया शाळेपासून 100 मीटर अंतरावर 30 मुले असलेली बस एका वळणावर उलटली, असे पोलिसांनी सांगितले. सुमारे 15 मुले जखमी झाली आहेत. त्यांना नजीकच्या मिशन हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
 
 
Ranchi school bus accident
 
school bus accident : अपघात झाला तेव्हा बस वेगात होती आणि चालक फोनवर बोलत असल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे. आज बसला 45 मिनिटे विलंब झाला. ती वेळ भरून काढण्यासाठी चालक बस वेगाने चालवत होता, त्याचवेळी फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचा दावा पालकांनी केला. अपघातानंतर पळून गेलेल्या बस चालकाचा शोध सुरू आहे. तसेच, पालकांच्या आरोपांची पडताळणी करण्याबरोबरच अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.