मुंबई,
Team David रविवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्ससाठी 258 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले, दिल्ली संघासाठी जेक फ्रेझर-मॅकगर्कने 84 धावांचे योगदान दिले आणि ट्रिस्टन स्टब्सने 47 धावांचे योगदान दिले. हे मोठे लक्ष्य गाठण्यात मुंबई इंडियन्स संघ चुकला आणि पराभव पत्करावा लागला.
मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 247 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला विजयाच्या लक्ष्यापर्यंत नेण्यासाठी अनेक फलंदाजांनी धडपड केली, त्यापैकी एक होता टीम डेव्हिड या फलंदाजाने 17 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान Team David टीम डेव्हिडने षटकार मारला ज्यामुळे मैदानात बसलेल्या एका चाहत्याला दुखापत झाली. त्यानंतर चाहत्याला तातडीने मेडिकल रूममध्ये नेण्यात आले. चाहत्याला दुखापत किती गंभीर आहे हे कळू शकले नाही. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत.