नवी दिल्ली,
Congress-Kanhaiya Kumar देशभरात लोकसभा निवडणुकांनी वातावरण तापलेलं असताना, दिल्लीतील काँग्रेस कार्यकर्ते मात्र वेगळ्याच कारणाने संतापलेले दिसत आहेत. Congress-Kanhaiya Kumar सामाजिक आंदोलनातून राजकारणात आलेल्या कन्हैया कुमारला उत्तर-पूर्व दिल्लीतून इंडी आघाडीनं उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. Congress-Kanhaiya Kumar या जागेसाठी स्थानिक उमेदवार देण्याची मागणी करीत, काँग्रेस कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे आजपासूनच कन्हैया कुमार दिल्लीत प्रचाराला सुरुवात करणार आहेत.
Congress-Kanhaiya Kumar दिल्लीच्या बाबरपूर भागात लोकसभा उमेदवार आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात संवाद आणि निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नियोजित होतं. त्यात, आज सकाळीच काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लव्हली यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. Congress-Kanhaiya Kumar त्यांच्या राजीनाम्यामागे कन्हैया कुमारला दिलेली उमेदवारी हेदेखील एक कारण मानले जात आहे. दरम्यान, कन्हैया कुमारच्या निवडणूक प्रचार कार्यालयात राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची छायाचित्रे असलेले पोस्टर्स लागले आहेत.
Congress-Kanhaiya Kumar या कार्यक्रमासाठी आम आदमी पार्टीचे समर्थक आणि कार्यकर्तेही पोहचले होते. त्यामुळे, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्तेही आपापसात भिडल्याचे दृश्य आहे. ‘व्होकल फॉर लोकल' अशी मागणी करीत, स्थानिक नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी करीत आहेत. Congress-Kanhaiya Kumar दरम्यान, काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव के.सी.वेणुगोपाल यांना ही स्थिती हाताळण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, अरविंदर सिंह लव्हली यांच्याशी बोलून, त्यांची नाराजी दूर करण्याचेही निर्देश देत, या समस्येतून मार्ग काढण्यास सांगितले.