Dhananjay Singh : अपहरण प्रकरणी शिक्षा कायम, खासदारकीचे स्वप्न भंगले

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
प्रयागराज, 
नमामी गंगे प्रकल्प व्यवस्थापकाच्या अपहरण प्रकरणात जौनपूरच्या विशेष न्यायालयाने पूर्वांचलचा बाहुबली माजी खासदार Dhananjay Singh धनंजयसिंहला 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा अलाहाबाद उच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने त्याला आता लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. एकल खंडपीठाचे न्या. संजय कुमारसिंह यांनी शनिवारी हा आदेश दिला.
 
 
Dhananjay Singh
 
Dhananjay Singh : धनंजय हा सध्या जामिनावर बाहेर आहे. गेल्या महिन्यात जौनपूरच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या वकिलाने लोकसभा निवडणूक लढवण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. खटल्यादरम्यान सिंह जामिनावर होते, त्यांनी जामिनाचा गैरवापर केला नाही आणि त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती, त्यामुळे शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत विशेष न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय दिला.