वाढीव वीजदराने कृषीपंपधारक शेतकर्‍यांचे मोडले कंबरडे

12 टक्के वीज दरवाढ : बळीराजा चिंताग्रस्त

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
agricultural pump farmers जसजसा उन्हाचा पारा वाढल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी सारेजण त्रस्त झाले आहेत. त्यातही वीजवितरणने कृषीपंपांच्या वीज दरात 12 टक्के वाढ करून शेतकर्‍यांना दरवाढीचे चटके देणे सुरू केले असून, यामुळे बळीराजा पुरता त्रस्त झाल्याचे चित्र जिल्ह्यात सध्या दिसत आहे. वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे. कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे.
 
 
agricultural pump farmers
 
कृषिपंपाच्या वीजदरात 12 टक्के वाढ केल्याने संकटात असलेल्या शेतकर्‍यांना महावितरणने जोरदार ‘चटके’ दिले आहेत. मागील काही वर्षांपासून शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करीत आहेत. अवकाळी पावसाचा फटका, शेतीमालास न मिळणारा भाव यामुळे शेतकरी चिंतित असताना वीजदरात 12 टक्के वाढ करून वीज कंपनीने मोठा धक्काच दिला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. agricultural pump farmers त्यानुसार दुसर्‍या टप्प्यातील वाढ नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिल महिन्यापासून लागू झाली आहे. या वीजदर वाढीमुळे वीज दरात 6 ते 12 टक्के वाढ होणार असून, स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही वीज ग‘ाहकांवर पडणार आहे. हा आकार सर्व प्रकारच्या वीज वितरणने दर महिन्याला बिल द्यावे, वीज वितरण कंपनी कृषीपंपाला दिवसाला आठ तास पुरवठा करते. मात्र वीज बील वार्षिक देत असल्याने हे बिल 24 तास वीज पुरवठ्याचे ठरत आहे. याचा भुर्दंड शेतकर्‍यांना नाहक बसतो आहे. मिटर असूनही दर महिन्याला बिले पाठवली जात नाही. वीज वितरणने वापरलेल्या विजेचेच बील द्यावे आणि शेतकर्‍यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी अनेक शेतकर्‍यांनी केली आहे.