एकतर माझ्या नावाचं कुंकू लावा नाहीतर त्यांच्या !

Pawar-NCP-Baramati चहाटळपणा थांबवा, दादा संतापले

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
बारामती,
 
 
Pawar-NCP-Baramati ''काहीजण दादा आले की, दादांच्या पुढे हलगी वाजवत असतात. फटाके वाजत असतात आणि दादाला दिसेल, असं पुढे चालत असतात आणि दादांची पाठ फिरली आणि दुसरे आले की, त्यांच्याबरोबर असतात. Pawar-NCP-Baramati अरे काय चाललंय तुमचं? एकाचे कुंकू लावा माझे तरी लावा नाहीतर, त्यांचे तरी लावा ! Pawar-NCP-Baramati हा काय लावलाय चहाटळपणा...नेमकं काय करायचं ते ठरवा,'' असं म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पुढे-पुढे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. बारामतीत प्रचार सभेत ते बोलत होते. Pawar-NCP-Baramati
 
 
Pawar-NCP-Baramati
 
काही कार्यकर्ते कधी शरद पवारांसोबत तर, कधी अजित पवारांसोबत दिसतात, असं सांगत अजित पवारांनी अशा कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. Pawar-NCP-Baramati अजितदादा पुढे म्हणाले की, ''मी असा दावा करणार नाही की १०० टक्के कामं झाली. पण, आमच्या हातात ज्यावेळेस सूत्र आली, तेव्हा आम्ही शांत बसलो नाही. मी पुन्हा सांगतो, बाबांनो भावनिक होऊ नका. काही झाकून राहत नाही. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो. त्या निंबोडे गावामध्ये घोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता आणि आपल्या भाषेत बोलायला गेलो. काय तिथं करावं, काय धरणात, या वाक्यामुळे माझं वाटोळं झालं. Pawar-NCP-Baramati कानाला खडाच लावला. कॅमेरा असो-नसो सारखे मेंदूला सांगत असतो. नीट बोलायचं. शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही आणि  ब्रेकिंगला मुद्दा द्यायचा नाही, असं पवार म्हणाले.
 
 
''आता साहेब उभे नाहीत, मी पण उभा नाही, आम्ही दोघेही नाही. Pawar-NCP-Baramati आता चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या बारामतीत आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं, हे तुम्ही ठरवा. सुनेला मान असतो, लक्ष्मी म्हणून समजतात, कुणाच्याही घरामध्ये सून आली तर सासू काही दिवसांनी तिच्या हातामध्ये चावा देतात ना आणि सगळे आता तू बघ आणि चुकले तर ती सुनेला सांगते,'' असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं.Pawar-NCP-Baramati