मतदान करा अन् पेट्रोल मोफत मिळवा

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
- पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनची घोषणा
 
पुणे, 
Pune Petrol Dealers Association : लोकसभा मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले मात्र या दोन्ही टप्प्यात विदर्भातील मतदारांनी निरुउत्साह दाखवला. अशातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने मोफत पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. मतदान केल्याचा पुरावा दाखवा आणि 50 रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा अशा घोषवाक्याचे होर्डिंग्स पेट्रोल पंपावर लावले आहे.
 
 
Voting
 
Pune Petrol Dealers Association : मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई दाखविल्यास 50 रुपयाचे पेट्रोल मोफत देण्यात येणार असल्याचे पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशन म्हटले आहे. यासाठी एक लिटर पेट्रोलची अट ठेवण्यात आली आहे. एक लिटर पेट्रोल खरेदी केल्यास त्यावर 50 रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जाणार आहे. यासाठी ‘व्होट कर पुणेकर’ ही मोहीम राबविण्यात आली आहे. पुणे लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 20 मेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध‘ुव रुपारेल यांनी दिली. मतदानासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करणार असून, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठीही मदत करणार असल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले.