ठाकरेंनी रचला होता शिंदेंना मारण्याचा कट

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
- शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा प्रचारसभेतून गौप्यस्फोट
 
कोल्हापूर, 
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना तसेच उद्धव ठाकरे गटाच्या प्रचार सभांचा धडाका सुरू असून, यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते Raju Waghmare राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
 
 
Raju
 
Raju Waghmare : जनसभेला संबोधित करताना वाघमारे म्हणाले, महाविकास आघाडीची सत्ता असताना मुंबईच्या हॉटेल हयातमध्ये संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या होत्या. उद्धव ठाकरे यांना बाजूला करून आपण सत्ता स्थापन करू, असा त्यांचा डाव होता तसेच गडचिरोली दौर्‍यावर पाठवून एकनाथ शिेंदे यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना रचला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या धमक्या येऊनही त्यांना उद्धव ठाकरेंकडून सुरक्षा देण्यात आली नव्हती. शिंदेंना बाजूला करून आदित्यला मुख्यमंत्री करायचे होते, असा आरोप करताना, मी एक दिवसाआड एक गोष्ट बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.