रावणवाडीत बालविवाह रोखला

28 Apr 2024 12:42:19
गोंदिया, 
Child Marriage तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन बालकाचे लग्न होणार असल्याची माहिती मिळताच चाइल्ड लाइनच्या पथकाने जाऊन घरच्यांचे समुपदेशन करीत बालविवाह रोखला. महिला व बालविकास विभाग तथा बाल संरक्षण कक्षांतर्गत चालणार्‍या चाइल्ड लाइनला 1098 वर रावणवाडी हदीतील एका गावात बालविवाह होणार असल्याची माहिती मंगळवार 23 एप्रिल रोजी मिळाली.
 

बाळ विवाह  
 
माहिती मिळताच प्रकल्प समन्वयक विशाल मेश्राम यांनी रावणवाडी पोलिस दिली. ठाणे व संबंधित यंत्रणेला सूचना मिळाली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाळे यांच्या मार्गदर्शनानुसार व बालविवाहमुक्त भारत अभियानचे समन्वयक ज्ञानेश्वर पटले, दीपमाला भालाधरे यांच्याशी समन्वय साधून मुलाच्या वडिलाकडून सत्य परिस्थिती व वयाचे पुरावे मागितले. त्यामध्ये मुलगा 20 वर्षे 6 महिन्यांचा आढळला. त्यावेळी त्यांचे योग्य समुपदेशन करण्यात आले व बालविवाह प्रतिबंधक कायदा 2005 बाबतीत विस्तृत माहिती दिली.Child Marriage तेव्हा मुलाच्या वडिलांचे समाधान झाले तसेच त्यांनी नियोजित विवाह थांबविण्यास होकार दिला. त्याचवेळी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वधू पक्षातील आप्तेष्टांनाही बालविवाह प्रतिबंधक कायद्याची परिपूर्ण माहिती देऊन त्यांचे समुपदेशन केले. यासाठी पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर, पोलिस पाटील महेंद्र घोडेस्वार, सहायक पोलिस निरिक्षक सुनील अंबुरे, कॉन्स्टेबल अरविंद चौधरी, सुबोध बिसेन आदींनी कायद्याचा प्रचार, प्रसार व योग्य अंमलबजावणी संदर्भात सहकार्य केले.
...
Powered By Sangraha 9.0