उत्पादकता वाढविण्यासाठी 'हे' प्रकल्प राबवा

जिल्हाधिकारी अजित कुंभार

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
-खरीप नियोजनाचा आढावा
अकोला,
SOYABEAN CROP जिल्ह्यातील शेती उत्पादकता वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प व्यापक स्वरूपात राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बुधवार 24 रोजी येथे अधिकार्‍यांना दिले. जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, विभागीय सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 
 

soyaben 
4 लाख 43 हजार 500 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित
SOYABEAN CROP जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किरवे यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले की, आगामी वर्षात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी आदी पिकांचे 4 लाख 43 हजार 500 हे. क्षेत्र प्रस्तावित असून, पेरणी क्षेत्रात 10 टक्के उत्पादकता वाढ प्रस्तावित आहे. चालू वर्षात खतांची 91 हजार 687 मे. टन इतकी मागणी प्रस्तावित असून, 15 एप्रिल अखेर 39 हजार 675 मे. टन साठा शिल्लक आहे. खरीप हंगामासाठी 68 हजार 885 क्विंटल बियाणे मागणी प्रस्तावित आहे अशी माहिती कृषी अधिकार्‍यांनी दिली आहे.
 
जिल्ह्यातील शेती उत्पादकता व शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत. कृषी वसंत योजनेत फलोत्पादन व पुष्पोत्पादन क्षेत्र विस्तार, सामूहिक शेततळे, तेलबिया पिके क्षेत्रविस्तार याबरोबरच अन्न, फळ प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी. खरिपाच्या दृष्टीने बियाणे, खतांची पुरेशी उपलब्धता असावी. कुठेही कमतरता किंवा साठेबाजी होता कामा नये, असे जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले.या अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष, भरारी पथके यांचीही माहिती त्यांनी घेतली. प्रत्येक पात्र शेतकर्‍याला पेरणी व निविष्ठांसाठी उपयोग व्हावा यासाठी खरीप पीक कर्जवितरण वेळेत व्हावे. त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.