साप्ताहिक राशिभविष्य

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
साप्ताहिक राशिभविष्य 
 
 
saptahik rashi
 
मेष (Aries) : आरोग्य सांभाळावयास हवे
Weekly Horoscope : या आठवड्यात आपणास आरोग्य सांभाळावयास हवे. काहींना उष्णतेचे व पोटाचे त्रास संभवतात. एखादे क्रॉनिक दुखणे असेल तर ते अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण होते तसेच छोट्या-मोठ्या अपघाताचे भयदेखील संभव आहे. आठवड्याच्या शेवटात तर या संबंधात विशेष काळजी घ्यावी. वाहने सांभाळून चालवा. वीज, आग यांची उपकरणे सावधपणे वापरा. आरोग्याबाबत कुणकुण निर्माण होताच उपचार घ्या. संतती सुखासाठी हा आठवडा चांगला दिसतो. त्यांच्या प्रगतीच्या बातम्या आनंद देतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे.   जकार्तामध्ये भूकंपाचे जोरदार झटके
शुभ दिनांक - 28, 29, 30, 2.
 
 
वृषभ (Taurus) : कार्यक्षेत्रात शुभ घटना
या आठवड्यात आपल्या नोकरी- व्यवसायात काही शुभकारक घटना घडू शकतात. कुटुंबात एखादी नवी खरेदी, मंगलकार्य, पाहुणे व मित्रांच्या गाठीभेटी यामुळे आनंदी वातावरण राहील. विदेशवारीच्या योजना आखत असाल तर त्याला तूर्त अपेक्षित गती मिळणार नाही. थोडे थांबून तत्संबंधी कामात हात घातला तर अधिक सुलभतेने सारे घडून येईल. या आठवड्यात काही मंडळींच्या शुभमंगलाचे वा ते जुळून येण्याचे योग निर्माण होऊ शकतात. व्यवसाय-कार्यक्षेत्रात जरा डोके शांत ठेवून कामे केलीत, तर सारे काही तुमचेच असणार आहे.  अभिनेता साहिल खानला अटक
शुभ दिनांक - 29, 30, 1, 2.
 
 
मिथुन (Gemini) : स्वभावावर नियंत्रण हवे
Weekly Horoscope : या आठवड्याची सुरुवात आपणास काहीशी खर्चिक व कष्टप्रद होणार असली, तरी आठवड्याच्या उत्तरार्धात काहीसा दिलासा निश्चितपणे मिळू शकेल. नोकरी- व्यवसायात मात्र उत्तम योग येतील. आर्थिक आवक वाढेल. व्यापारात वाढ होईल. नोकरीत असणार्‍यांचा अधिकार, पद, दर्जा वाढेल. धनलाभ होईल. साहित्यिक- कलावंतांना तर हा काळ उत्कृष्ट ठरावा. आपल्या कामाचे कौतुक होऊन मान-सन्मान, पुरस्कार मिळू शकतील. मैफिली रंगू शकतात. डोक्याला ताप करून घेऊ नये. चिडचिड, संताप, भांडणे यांना आवर घाला.  चीनच्या चक्रीवादळात पाच ठार, 33 जखमी
शुभ दिनांक - 28, 30, 2, 3.
 
 
कर्क (Cancer) : कुटुंबात मतभेद टाळा
या आठवड्यात कुटुंबात आनंदी व समाधानाचे वातावरण ठेवण्यासाठी आपसात मतभेद निर्माण होऊ देऊ नयेत. व्यवसाय व आपल्या कार्यक्षेत्रातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा. आरोग्य सांभाळावयास हवे. व्यसनांना लगाम घालायला हवा. काहींना उष्णतेचे त्रास वाढण्याचे संकेत दिसतात. वाहने सांभाळून चालवायला हवीत. किरकोळ अपघाताचे भय आहे. काहींना एखादेवेळी हॉस्पिटलची वारी करावी लागू शकते. आर्थिक व स्थावराचे व्यवहार सांभाळून करावेत. कोणावरही विसंबून राहू नका. विद्यार्थ्यांना उत्तरार्ध उत्तम राहील. समाधानकारक यश मिळून पुढची वाट सुकर होईल.
शुभ दिनांक - 1, 2, 3, 4.
 
 
सिंह (Leo) : धडाडीमुळे प्रतिमा उजळेल
Weekly Horoscope : या आठवड्यात आपल्या कामांना अपेक्षित गती मिळण्यास सुरुवात होईल. गेल्या काही दिवसात जाणवत असलेली काहीशी मरगळ आता दूर होऊ शकेल. या धडाडीमुळे आपली प्रतिमा उजळेल. प्रतिष्ठा मिळेल. या सार्‍या बदलामुळे आपली आर्थिक घडी उत्तम बसू शकेल. काही नवे उपक्रम सुरू केले असतील तर त्यात यश मिळून तिजोरीत भर पडेल. नोकरी-व्यवसायातील शत्रुवर्गावर आपला वचक निर्माण होईल. तरीही सावध राहावयास हवे. मित्रांसोबत मतभेद, नियमाविरुद्ध वर्तन, चौकटीबाहेर, क्षमतेबाहेर काम करण्याचा प्रयत्न टाळावा.
शुभ दिनांक - 28, 30, 1, 2.
 
 
कन्या (Virgo) : कामे रेंगाळून मनस्ताप
या आठवड्यातील ग्रहस्थिती पाहता आपणास संमिश्र योग अनुभवास येऊ शकतात. काही कामे अनपेक्षितपणे पूर्ण होतील तर काही अनावश्यक रेंगाळून मनस्ताप देतील. सरकारी कामातील विलंब त्रासदायक ठरेल तसेच ही ग्रहस्थिती या आठवड्यात आपणास स्वतःच्या आरोग्याबाबतही सचेत राहण्यास सुचवत आहेत. वाहने सांभाळून चालवा. चंचलता व घाई करण्याच्या वृत्तीमुळे हे लोक नेहमी सिग्नल तोडून वाहन पुढे दामटतात. असा प्रकाराला लगाम घाला. विशेषतः युवा मुला-मुलींनी हे भान ठेवावयास हवे. विद्यार्थी वर्गाला उत्तम काळ आहे.
शुभ दिनांक - 28, 29, 2, 3.
 
 
तूळ (Libra) : मुलांकडून अपेक्षांची पूर्तता
Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहयोग आपणास आरोग्याची काळजी घेण्यास सुचवीत आहेत. साथीचे रोग, पोटाचे त्रास, डोळ्यांचे त्रास वगैरेंमुळे काही मंडळी त्रस्त होऊ शकतात. पथ्य सांभाळले पाहिजे. त्रास जाणवू लागताच उपचार घेऊन आरोग्य उत्तम राखले पाहिजे. विशेष म्हणजे आपल्या मुलांसाठी हा आठवडा अतिशय चांगला ठरू शकतो. त्यांच्याकडून मनास समाधान मिळेल अशा वार्ता कळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहावे. काही तेढ निर्माण होऊ देऊ नये. मुलांकडून सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक - 28, 30, 2, 4.
 
 
वृश्चिक (Scorpio) : परिश्रमाचे चीज होईल
या आठवड्यात काही चांगल्या बातम्या आपल्या कानावर पडू शकतील. नोकरी-व्यवसायात आपल्या परिश्रमाचे चीज होईल व त्यातून आर्थिक लाभ मिळू शकेल. मानाचे पद, अधिकार वाढ, व्यावसायिकांना विस्ताराच्या प्रयत्नात यश वगैरे एखादी उत्तम संधी मिळू शकते. आर्थिक आवक वाढून दिलासा मिळेल. छुप्या शत्रूंपासून मात्र सावध राहायला हवे. त्यांच्या कारवाया वेळीच आटोक्यात आणावयास हव्या. वाहने सांभाळून चालवावीत. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांना उत्तरार्धात अधिक उत्तम योग लाभतील. आपल्या मेहनतीचे चीज होईल.
शुभ दिनांक - 29, 2, 3, 4.
 
 
धनु (Sagittarius) : भाग्याला कर्तृत्वाची जोड
Weekly Horoscope : या आठवड्यात आपल्या वाट्याला आलेले ग्रहमान बघता आपल्या योजनांना भाग्याची आणि कर्तृत्वाची सुरेख जोड देता येऊ शकेल. नोकरीत असलेल्यांना अधिकारी वर्गाची मर्जी संपादन करता येईल. मिळालेले टार्गेट पुरे करून इन्सेटिव्हज्चा लाभ मिळविता येऊ शकेल. व्यवसायात असाल तर आपण विरोधकांच्या स्पर्धेला निश्चितपणे तोंड देऊन पुढे जाल. आपले ईप्सित गाढू शकाल. नवे उपक्रम राबवू शकाल. आपल्या विरोधात कोणी कुरापती काढण्याच्या प्रयत्नात असतील तर तिकडे दुर्लक्ष नको. संततीला सध्या उत्तम काळ आहे.
शुभ दिनांक - 30, 1, 3, 4.
 
 
मकर (Capricorn) : कलावंतांना उत्तम संधी
या आठवड्यात कला व साहित्य क्षेत्रात असलेल्या या राशीच्या मंडळींना उत्तम संधी मिळाव्यात असे ग्रहमान लाभले आहे. या आठवड्यात काही विशेष कामे यांच्याकडून होऊ शकतील. त्यामुळे प्रतिष्ठा व मानसन्मान वाढेल. सरकार दरबारी आपले वजन निर्माण होईल. दरम्यान, काही व्यक्तींना आरोग्याची कुरबूर सहन करावी लागेल. याबाबतीत या आठवड्याच्या सुरुवातीचे काही दिवस क्लेषकारक राहू शकतील. वीज व आगीची उपकरणे सांभाळून हाताळावी. युवा वर्गासाठी अतिशय उत्तम काळ.
शुभ दिनांक - 30, 1, 2, 3.
 
 
कुंभ (Aquarius) : आर्थिक आघाडीवर हातघाई
Weekly Horoscope : या आठवड्यात आपणास आर्थिक व व्यावसायिक आघाडीवर बरीच उलथापालथ अनुभवास येऊ शकते. आठवड्याच्या आरंभीच या बाबतीत बरीच कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. अतिशय कठीण नसला तरी क्षणाचीही उसंत न देणारा हा काळ आपण सध्या उपभोगत आहात, असे दिसते. कुटुंबातून काही मोठे खर्च अचानक समोर येऊ शकतात. काहींच्या बाबतीत व्यवसाय बदलणे, व्यवसायात मोठे परिवर्तन करावे लागणे, नोकरीत बदल, कार्यक्षेत्रातील शत्रूंचा उपद्रव असे काही घडू शकते. संततीबाबत चिंता निर्माण होऊ शकते.
शुभ दिनांक - 29, 30, 1, 4.
 
 
मीन (Pisces) : आर्थिक सहजतेतून समाधान
Weekly Horoscope :  या आठवड्यात आपणास सुरुवातीस लाभलेले ग्रहमान बघता आर्थिक आघाडीवर सहजता अनुभवास येऊन त्यातून समाधान लाभेल. मात्र, असे असले तरी मेहनतीची कास सोडू नये. काहींना एखाद्या प्रकरणातील नुकसान भरपाई मिळण्याच्या स्वरूपात किंवा वाटणीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळू शकतो. छंद-कला यांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणार्‍यांना हा काळ आर्थिक लाभाचा ठरावा. काहींना मात्र हा काळ संततीबाबत चिंता निर्माण करणारा ठरू शकतो. त्याचप्रमाणे हृदयाचे, पोटाचे त्रास असलेल्यांनीही सध्या काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चीज होताना दिसेल.
शुभ दिनांक - 29, 1, 3, 4.
 
मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746