जिल्ह्यातील 133 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
scholarship महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत सन 2023-24 सत्रासाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या नियंत्रणात इयत्ता 8 वीकरिता 24 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल 12 एप्रिल रोजी घोषित करण्यात आला. यात जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खजगी शाळेतील 133 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
 
 

schorlship 
 
परीक्षेकरिता जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या इयत्ता 8 वीतील 4,772 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षेला 4,694 विद्यार्थी बसले. त्यापैकी 890 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात 133 विद्यार्थी पात्र ठरलेे. पात्र विद्यार्थ्यांमध्ये 47 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणारे आहेत. शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना 5 वर्षांकरिता दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.scholarship  यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये व उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांनी कौतुक केले आहे.